ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदासाठी सालेह यांच्या उमेदवारीला अमेरिकेचा पाठिंबा - अमरुल्लाह सालेह राष्ट्रपती पद समर्थन

अफगाणिस्तानचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या या कृत्याला अमेरिकेच्या शीर्ष धोरण विश्लेषकाने पाठिंबा दिला आहे. यासाठी त्याने अफगाणिस्तानच्या संविधानाचा हवाला दिला आहे.

Amarullah Saleh
अमरुल्लाह सालेह
author img

By

Published : Aug 19, 2021, 3:59 PM IST

Updated : Aug 19, 2021, 7:35 PM IST

हैदराबाद - अफगाणिस्तानचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या या कृत्याला अमेरिकेच्या शीर्ष धोरण विश्लेषकाने पाठिंबा दिला आहे. यासाठी त्याने अफगाणिस्तानच्या संविधानाचा हवाला दिला आहे.

  • Nations must respect the rule of law , not violence. Afghanistan is too big for Pakistan to swallow and too big for Talibs to govern. Don't let your histories have a chapter on humiliation and bowing to terror groups. https://t.co/nNo84Z7tEf

    — Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) August 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा वाढवली; भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

मायकल जॉन्स, असे या विश्लेषकाचे नाव आहे. मायकल हे नॅशनल टी पार्टी मुव्हमेंटचे सहसंस्थापक आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे माजी भाषण लेखही आहेत. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, 2004 साली स्वीकारण्यात आलेले अफगाणिस्तानचे संविधान सध्याच्या घडीला देशात जी परिस्थिती उदयास आली आहे, त्यावर राष्ट्र शासनास मार्गदर्शन करते. अशा परिस्थितीत, पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्याकडे अध्यक्षपद जाते. राष्ट्राने कायद्याचा आदार केला पाहिजे, हिंसेचा नाही.

सालेह यांनी मायकल यांचे हे ट्विट शेअर करून आपली विश्वासार्हता ठामपणे व्यक्त केली आहे. सालेह सध्या अगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात आश्रयास आहेत. ते अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांच्याबरोबर तालिबान विरोधी शक्तींना बळकट करत आहेत.

देशाने कायद्याचा आदर केला पाहिजे, हिसेचा नाही. पाकिस्तानला गिळण्यासाठी अफगाणिस्तान खूप मोठा आहे आणि ते तालिबान्यांना शासन करण्यासाठी देखील मोठे आहे. तुमच्या इतिहासात दहशतवादी गटांपुढे झुकने आणि अपमाणीत होणे याबद्दलचा अध्याय होऊ देऊ नका, असा संदेश देखील सालेह यांनी ट्विटद्वारे अफगाणिस्तानच्या जनतेस दिला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. पंजशीर येथे तालिबानला रोखण्याची तयारी सुरू आहे.

Last Updated : Aug 19, 2021, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.