- मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासावर निर्बंध आणले आहे. मात्र तरीसुद्धा आज सर्रासपणे बनावट ओळखपत्राच्या आधारावर सामान्य प्रवासी सुद्धा लोकल प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रवाशांवर आळा घालण्यासाठी आता राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कंबर कसली आहे. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास देण्यात येणार आहे. यामुळे लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळणार आहे. वाचा सविस्तर
- भंडारा - कोरोना नियमांची पायमल्ली करत मोठ्या संख्येने लोकांना बोलावून लग्न सोहळा साजरा करने एका आयोजकाला चांगलेच महागात पडले. या आयोजकावर भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावत तो वसूलही केला आहे. भंडारा शहरालगत ठाणा गावातील बावनकुळे सभागृहात हा प्रकार घडला. वाचा सविस्तर
- मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहेत. पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरील उद्यापासून (सोमवार) 15 डब्ब्यांची लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अंधेरी ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहे. आज (रविवारी) 746 रुग्णांची नोंद झाली असून 13 मृत्यूची नोंद झाली आहे. 1295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 728 दिवसांवर पोहचला आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप असून फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच ओबीसी समाजाला चार महिन्यात आरक्षण देईन, अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवालही देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. वाचा सविस्तर
- औरंगाबाद - 'आमच्या शेतातील रस्त्यातून तुम्ही का जाता' असे म्हणत 12 जणांनी चुलत्याला घरात शिरुन गजाने मारहाण केली. या हाणामारीत एका ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले. माणिक दादा नवपुते असे मारहाणीतील मृताचे नाव आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी श्रीराम नवपुते आणि भास्कर नवपुते यांना अटक केली आहे. वाचा सविस्तर
- पंढरपूर (सोलापूर) - 'सध्याची राष्ट्रवादी ही शरद पवार यांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही. शरद पवार साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी असती तर राज्यातील जनतेला रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती', असा हल्लाबोल भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केला आहे. वाचा सविस्तर
- औरंगाबाद - सराफा बाजारातील मोहन थिएटरमागे एका युवतीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ईशा राजेश तंगडपल्ली असे त्या तरुणीचे नाव आहे. ईशा तंगडपल्ली सरस्वती भवन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडिल सलून दुकानात काम करतात, तर आई कपड्यांच्या दुकानात कामाला जाते. वाचा सविस्तर
- ब्रिस्टोल - भारतीय महिला क्रिकेटमध्ये शफाली वर्माने रविवारी (27 जून) इतिहास रचला. १७ वर्षीय शफालीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. यासह ती क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात डेब्यू करणारी सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरली आहे. १७ वर्ष १५० दिवसांची शफाली वर्माने आज आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याआधी तिने १५ वर्ष २३९ दिवसांची असताना पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. तर १७ वर्ष १३९ दिवसांची असताना तिने कसोटीत डेब्यू केला. शफालीने आतापर्यंत २२ टी-२० सामने आणि १ कसोटी सामना खेळला आहे. वाचा सविस्तर
- ब्रिस्टोल - सलामीवीर टॅमी ब्यूमोंट (८७) आणि नताली सीवर (७४) या दोघींच्या नाबाद वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ८ बाद २०१ धावा केल्या होत्या. भारताने दिलेले हे आव्हान इंग्लंडने टॅमी आणि नतालीने तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीच्या जोरावर ३४.५ षटकात दोन गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. इंग्लंडने या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM : संध्याकाळी 11 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
top ten

Last Updated : Jun 27, 2021, 10:52 PM IST