- मुंबई - आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडी तसेच विधानसभा अधिवेशनाच्या तयारीबाबत चर्चा केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच यावेळी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली असून 'संघटना बळकट असेल, तर सरकार प्रदीर्घ काळ टिकेल आणि मुख्यमंत्री आमचाच राहील', असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा...
- पुणे - राज्यात कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात खबरदारी घेत नवे नियम जाहीर केले आहेत. त्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत लेव्हल ३ चे निर्बंध लागू झाले आहेत. त्यानुसार आता शहरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तर, शनिवारी आणि रविवारी अत्यावशक सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. सोमवारी, २८ जूनपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिका आयुक्तांनी महापालिका हद्दीसाठी सुधारित आदेश पारित केले आहेत. सविस्तर वाचा...
- मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईतील मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आला होता. या संदर्भात पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुंबईतील कुलाबा परिसरातील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल आला होता. दरम्यान, हा कॉल एका लहान मुलाने केला असल्याचे माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- कोल्हापूर - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात भाजपाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाने हे आंदोलन केले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षणावरून केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा अगोदर तुमच्यातील ओबीसी समाजाचा नेता ठरावा, मगच ओबीसी आरक्षणावर बोला. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्हापुरातील बिंदू चौकात खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी केले. दाभोळकर कॉर्नर येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनात ते बोलत होते. सविस्तर वाचा...
- बीड- एका 25 वर्षीय विवाहित महिलेला विष देऊन मारले, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या मृत महिलेच्या सासरच्या मंडळींंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठिय्या मांडला. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात घडली. शुक्रवारी रात्री 11 वाजता गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह ठाण्यात आणल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. कांचन विशाल राठोड (वय 25 वर्ष रा. गेवराई) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सविस्तर वाचा...
- सातारा - ओबीसी आरक्षणासाठी आज भाजपातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. साताऱ्यातही आज ९ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भाजपाच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश असताना हे आंदोलन करण्यात आले. सविस्तर वाचा...
- नागपूर - ओबीसी आरक्षण दरम्यान नागपुरात आयोजित चक्का जाम आंदोलन करण्यात आले आले. हे आंदोलन राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी फडणीस यांनी आमच्या हाती सूत्रे दिले तर तीन महिन्यात ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून देऊ आणि जर हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईल, असे आव्हान दिले आहे. सविस्तर वाचा...
- नागपूर - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील विरोधीपक्षात असलेल्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभर भाजपाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नागपुरात या आंदोलनाचे नेतृत्त्व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी फडणीस यांनी 'राज्याची सूत्रे आमच्या हाती दिली, तर तीन महिन्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देऊ अन्यथा राजकीय संन्यास घेईल', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाले असून राज्याचे मंत्री 'आम्ही ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राखण्यासाठी सर्व प्रयत्न करू, असे सांगतात तर दुसरीकडे न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्याविरोधात याचिका दाखल करतात, असा आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा...
- नवी दिल्ली - कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियन्टने सरकारची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्टमेंट क्षेत्र घोषित करणे, गर्दी टाळणे, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे व डेल्टा प्लस आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला पत्र पाठविले नाही. सविस्तर वाचा...
- कोची - भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका समुद्रातील चाचणीसाठी तयार झाली आहे. देशाला सर्वाधिक प्रतिक्षा असलेल्या विमानवाहू युद्धनौकेचे काम शेवटच्या टप्प्यात कोचीन शीपयार्डमध्ये सुरू आहे. सविस्तर वाचा...
Top 10 @ 9 PM : नऊ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Last Updated : Jun 26, 2021, 9:05 PM IST