- मुंबई - राज्यातील गरीब जनतेला मोफत 'शिवभोजन' थाळीची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली. वाचा सविस्तर
- अमरावती - माजी राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील दमदार नेता अशी ओळख असणारे डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसबाहेर एक तप घालवून शनिवारी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या या भूमिकेबाबत अमरावती शहर काँग्रेसमध्ये उत्साह असताना भाजपने मात्र सडाडून टीका केली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून, निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. वाचा सविस्तर
- मुंबई - कोरोना आला आणि देशात हाहाकार माजविला. त्याच्याशी लढण्यासाठी वॅक्सीनची निर्मिती करण्यात आली परंतु आता काही ठिकाणी त्यावरूनही हाहाकार माजताना दिसतोय. इथे राजकारणीय काहीच नाहीये तर इथे लोकांच्या आयुष्याचा, तब्येतीचा प्रश्न आहे. टिप्स इंडियाचे सर्वेसर्वा रमेश तौरानी सध्या चिंताग्रस्त आहेत कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांना खोटी लस दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार होत होता आणि आता कोरोनावर मात करण्यासाठी आलेल्या लस संदर्भातही काळाबाजार होताना दिसतोय. वाचा सविस्तर
- पुणे - साडी नेसून बाईक किंवा घोड्यावर राईड करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र एका महिलेने चक्क साडी नेसून जिममध्ये झिंगाट थाटात व्यायाम केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कोण आहे ही महिला आणि साडी नेसून ही महिला जिममध्ये व्यायाम का करते आहे जाणून घ्या... वाचा सविस्तर
- मुंबई - शिवसेनेचा शनिवारी 55वा वर्धापनदिन आहे. दरवर्षी हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वर्धापनदिनाचा कार्यक्रम परंपरेप्रमाणे करता आला नाही. यंदाही दुसरी लाट धडकली. ती शांत होत असली तरी पुन्हा उसळू नये म्हणून गर्दी टाळण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोरोनाने श्वास घेणे कठीण केले असले तरी श्वासाश्वासात शिवसेना आहे. शिवसेना 55 वर्धापनदिन सोहळा होणार नाही. तरी कोरोनाशी दोन हात करण्यात यशस्वी ठरलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षीप्रमाणेच वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. वाचा सविस्तर
- मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान टप्प्याटप्प्याने एकेक प्रकरणाचा खुलासा केला जात आहे. आतापर्यंत 10 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस खात्यात एकेकाळी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तेवढेच विवादात राहिलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह 10 आरोपींना या स्फोटक प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अँटिलिया इमारतीच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या संदर्भातील तपासाचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत... वाचा सविस्तर
- मुंबई - राज्य सरकारकडून जिल्ह्याचे पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वात अधिक आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर
- कोल्हापूर - जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले आहेत. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील हॉटेस सूर्या जवळ आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाऱ्यासह संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटनासमोर येत आहेत. वाचा सविस्तर
- अहमदाबाद - गुजरातच्या साबरमती नदी तसेच कांकरिया, चांदोला तलावाकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू असल्याचे आढळून आले आहे. गांधीनगर आयआयटीसह ८ संस्थांनी मिळून केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

Last Updated : Jun 18, 2021, 10:52 PM IST