- मुंबई - राज्यात गुरुवारी(20 मे) 29 हजार 911 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 738 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी 47 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 50 लाख 26 हजार 308 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 49 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - पीएम केअरमधून मिळालेल्या 4 हजार 127 व्हेंटिलेटरपैकी केवळ 332 व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. तर, शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 250 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली. सविस्तर वाचा..
- मुंबई - दहावी बोर्डाची परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. दहावीच्या परीक्षेचा गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश देऊन यासंदर्भात पुढील आठवड्यात राज्य सरकारला सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. शिवाय शिक्षणाच्या बाबतीत चेष्टा चालवली आहे का, असा सवाल करत राज्य सरकारला खडसावले आहे. सविस्तर वाचा..
- ठाणे - राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आली नसून, सध्याची दुसरी लाट अजून ओसरली नसल्याची माहिती महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ संजय ओक यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना दिली आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी थोडीफार कमी होताना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत आहे. पण हा सर्व रेट मंदगतीने कमी होताना दिसत असल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - कोरोना संकटामुळे सर्व क्षेत्रावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जगायचं कसं असा प्रश्न सर्व क्षेत्रातील लोकांसमोर उभा राहिला आहे. शूटिंग बंद असल्याने मनोरंजन क्षेत्रला मोठा फटका बसलेला आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्या काय अडचणी निर्माण झाल्या आहेत याचा आढावा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या 'झूम' संवादाचं आयोजन केलं होतं. राज ठाकरे यांनी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांशी बातचीत केली. यावेळी राज ठाकरे यांनी तुमचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडेन असे आश्वासन दिले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका दिवसाचा कोकण दौरा करणार आहेत. उद्या शुक्रवार दिनांक 21 मे रोजी त्यांचा कोकण दौरा असून, या दौऱ्यादरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी लागणाऱ्या अॅम्फोटेरिसीन-बी या औषधाचा तुटवडा आहे, ही समस्या लवकरच सोडविली जाणार असल्याचे केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. औषधाच्या निर्मितीसाठी नवीन औषध कंपन्यांना परवानगी मिळणार असल्याचेही केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी सांगितले. म्युकरमायकोसिस हा रोग ब्लॅक फंग्स या नावानेही ओळखला जातो. या रोगाची लागण झाल्यास नाक, डोळे आणि मेंदुचेही नुकसान होऊ शकते. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. उत्तर प्रदेशात गंगा नदीमध्ये अनेक प्रेतं तंरंगताना दिसत आहेत. यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका केली. सविस्तर वाचा..
- तिरुवनंतपुरम - केरळमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा सत्ता आली आहे. या सत्तेत शरद पवार यांची राष्ट्रवादीही सहभागी आहे. दोन आमदार असूनही राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. शरद पवारांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि राष्ट्रवादीचे आमदार ए. के. शशीधरन यांना दुसऱ्या टर्मसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM

Last Updated : May 21, 2021, 1:36 PM IST