ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM
author img

By

Published : May 19, 2021, 7:03 AM IST

Updated : May 19, 2021, 1:29 PM IST

मुंबई : अशा प्रकारच्या मोहिमा या नेहमीच अवघड असतात. केवळ आपत्कालीन स्थिती आहे म्हणून अतातायीपणा करणे शहाणपणाचे नसते. आतापर्यंत १८५ लोकांना आम्ही वाचवले आहे. सर्व सुरक्षा दलांनी मिळून काम केल्यामुळे ही मोहीम यशस्वी होताना दिसून येत आहे. या बार्जवरील सुमारे ३०० लोक आणखी दोन जहाजांच्या मदतीने समुद्रात निघण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र, आम्ही त्यांना बार्जवर थांबण्यासाठी सांगितले, तसेच आम्ही त्यांना वाचवू असा विश्वासही त्यांना दिला. त्यामुळे या सर्व लोकांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. हे सर्व जर दुसऱ्या जहाजांमधून समुद्रात निघाले असते, तर मात्र ही मोहीम आणखी अवघड झाली असती. सविस्तर वाचा..

मुंबई - अरबी समुद्रात अडकलेल्या P-305 या बाजूवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू आहे. यासाठी आयएनएस-कोची या युद्ध नौकेच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 185 जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी 124 जणांना मुंबईत सुरक्षित आणण्यात आलेले आहे. आयएनएस कोचीचे सीईओ सचिन सिक्वेरा यांनी याबाबतची माहिती दिली. आएनएस कोची आज सकाळी मुंबई हार्बर बंदरात दाखल झाले. सविस्तर वाचा..

सिंधुदुर्ग - लाईट हाऊस आणि लाईट शिप संचालनालयाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक आयलॅण्डवर अडकून पडलेल्या दोन कर्मचाऱ्यांना भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाकडून सुखरूपरित्या आज (बुधवारी) गोव्यात आणण्यात आले आहे. भयावह चक्रीवादळात हे कर्मचारी समुद्रात वेंगुर्ला रॉक आयलॅण्डवर अडकून पडले होते. सविस्तर वाचा..

मुंबई : बार्ज पी३०५ या हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात लोकांना वाचवण्यासाठी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' रात्रीपासून मेहनत घेत आहेत. या दोन्ही बोटींवरील पथकांनी सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत ६० लोकांना वाचवले होते. त्यानंतर 'एनर्जी स्टार' आणि 'अहल्या' जहाजानेही या बचावकार्यात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत १३२ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली होती. त्यानंतर दुपारपर्यंत एकूण १७७ जणांना वाचवण्यात आले आहे. इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे 'गॅल कन्स्ट्रक्टर' हे जहाज वादळाच्या तीव्रतेने समुद्रात वाहून गेले होते. या जहाजावर एकूण १३७ लोक होते. अजूनही बाकी लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाहा या बचावकार्याचा व्हिडिओ... सविस्तर वाचा..

मुंबई - राज्यात थैमान घालून गुजरातच्या वाटेने राजस्थानात दाखल झालेल्या तौक्ते वादळाचा परिणाम अजूनही शहरात जाणवत आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून हे वातावरण असेच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही विभागाने वर्तविली आहे. सविस्तर वाचा..

मुंबई- कांदिवली स्थानकाजवळ एका लोकलमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक थांबली होती, या गाडीचा पेंताग्रफ बंद पडला होता. त्यामुळे मुंबई कडे येणारी फास्ट मार्गावरील वाहतूक रखडली होती.यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आता देखील वाहतूक विस्कळित आहे,या घटनेमुळे अनेक लोकल सेवांना लेटमार्क लागलेला आहे.रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचून बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.लवकरच वाहतुक व्यवस्था सुरळीत होईल असे पश्चिम रेल्वे तर्फे सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल. या बैठकीत चक्रीवादळाचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत देण्यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा..

गांधीनगर (गुजरात) : तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातला मोठा तडाखा बसला आहे. राज्याच्या किनारपट्टीसह सौराष्ट्र भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यात या वादळामुळे १३ जणांचा जीव गेला असून घरे, झाडे, वीजेचे खांब यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरात आणि दीव दौऱ्यावर असणार आहेत. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ६७ हजार ३३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, एका दिवसातील सर्वाधिक ४,५२९ मृत्यूंची नोंद करण्यात आली. दरम्यान, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला. सविस्तर वाचा..

मुंबई - १८ मे हा ज्युनियर सोनाली कुलकर्णीचा वाढदिवस. आजच्या दिवशीच तिने तिच्या लग्नाची खबर संपूर्ण जगताला कळविली. खरंतर लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे विलीनीकरण. भारतीय संस्कृतीप्रमाणे हा सोहळा नेहमीच थाटामाटात साजरा केला जात आलाय. सविस्तर वाचा..

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा..

Last Updated : May 19, 2021, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.