ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 14, 2021, 7:00 AM IST

Updated : May 14, 2021, 1:12 PM IST

  1. नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक-५ लसीला देशात वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता या लसीच्या डोसची किंमत जाहीर करण्यात आली आहे. ९९५.४० रुपये प्रति डोस अशी या लसीची किंमत असणार आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी लिमिटेड या लसीचे उत्पादन घेत आहे. सविस्तर वाचा..
  2. मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात पोहचले असून मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान महत्वाची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहलही उपस्थित आहेत. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. सविस्तर वाचा..
  3. पणजी/सिंधुदुर्ग - गोव्यात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल 76 रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाला आहे. तर 2491 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. सविस्तर वाचा..
  4. मुंबई - मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यानंतर मराठा आरक्षणप्रश्नाचा पाठपुरावा करणारे संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच आता कायदेशीर लढाई लढण्यासाठी मराठा समाजाला पुन्हा एकदा तयार राहावे लागणार असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. सविस्तर वाचा..
  5. पंढरपूर - अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आज 6500 हापूस आंब्यांची व आंब्याच्या पानांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी खास रत्नागिरी येथून 6500 हापूस आंबे व विविध फळे मागविण्यात आले आहेत. सविस्तर वाचा..
  6. मुंबई - केंद्र सरकारला वाटत असेल की, आम्ही लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, प्रमाणपत्रावरील फोटो तसाच राहील. आपण आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सविस्तर वाचा..
  7. नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम-किसान योजनेच्या आठव्या टप्प्याचे उद्घाटन करतील. या टप्प्यामध्ये १९ हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) आजच्या टप्प्यातून ९.५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सविस्तर वाचा..
  8. वॉशिंग्टन : जगभरातील बहुतांश देशांमध्ये आता कोरोनापूर्व परिस्थिती परतत आहे. अमेरिकाही यात मागे राहिली नसून, आता पूर्ण लसीकरण झालेल्यांना देशात मास्कची सक्ती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यक्तींना घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही मास्क वापरणे अनिवार्य नसणार आहे. सविस्तर वाचा..
  9. सोलापूर - वैशाख शु.तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थ कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते. यंदाची अक्षय तृतीया साधेपणाने आणि घरात राहून साजरी करा. तसेच यंदाच्या अक्षय तृतीयेला जल आणि पादत्राणे दान करण्याचे आवाहन सोलापुरातील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. सविस्तर वाचा..
  10. मुंबई - राज्यात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या चालकांना कोरोना संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. या निर्णयाचा विपरीत परिणाम मालवाहतूक साखळीवर होणार असल्याने, राज्य सरकारने सबंधित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी केली आहे. सविस्तर वाचा..

Last Updated : May 14, 2021, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.