ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर..

top ten news stories around the globe
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 4, 2021, 7:10 AM IST

Updated : May 4, 2021, 1:10 PM IST

  1. मुंबई - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. राज्यात दिवसाला सरासरी 55 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर देशात नव्या रुग्णांची नोंद होण्याची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. पीआयबीकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 12 जिल्ह्यांत रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सविस्तर वाचा..
  2. पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मार्फत कोरोना रुग्णांना मोफत बेड असताना या बेडसाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तीन डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पालिकेच्या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा..
  3. मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारावर दुःख व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडविण्यात खतपाणी घालणारे हे पश्चिम बंगालमधले आहेत की बाहेरून कोणी याला खतपाणी घालत आहे हे देखील पाहायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर वाचा..
  4. मुंबई - सीबीआयकडून दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता मुंबई उच्च न्यायालय गाठले आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची प्राथमिक चौकशी करून सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. त्याविरोधात अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयाची वाट धरली. सविस्तर वाचा..
  5. नवी दिल्ली - देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी पुरेशी लस उपलब्ध नसताना सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सरकारने पुढील लसींसाठी सीरमला ऑर्डरच दिली नसल्याचा आरोप समाजमाध्यमांमधून करण्यात येत होता. मात्र हा आरोप खोटा असून, येत्या काही महिन्यात ११ कोटी डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचे अदर यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
  6. सिअ‌ॅटल : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली २७ वर्षे ते एकमेकांसोबत होते. मेलिंडा गेट्स या मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापकही आहेत. सविस्तर वाचा..
  7. मुंबई : परमबीर सिंग सरकारची पोलखोल करत असल्याने तसेच संजय पांडेंना स्वतःच एक्सपोज होण्याची भिती वाटत असल्याने त्यांनी सिंग यांची चौकशी करण्यास नकार दिला असावा असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. सविस्तर वाचा..
  8. सांगली - वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज, सांगली आणि कुपवाड याठिकाणी सात दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. बुधवार 5 मेपासून 11 मेपर्यंत सात दिवसांचा हा जनता कर्फ्यु असणार आहे. मनपातील सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली. सविस्तर वाचा..
  9. मुंबई : ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणाऱ्या छगन भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांचे जाहीर अभिनंदन केले. मग त्यांनाही चंद्रकांत पाटील गुजरातमधील जुन्या प्रकरणांची थडगी उकरून काढण्याच्या धमक्या देणार का? असा सवाल विचारत सामनामधून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
  10. कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी आठ वाजल्यापासून म्हणजेच थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 18 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया सुरू राहणार असून दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. वाचा लाईव्ह अपडेट्स..

Last Updated : May 4, 2021, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.