- मुंबई - शहरात गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. गेले काही दिवस रूग्ण संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढली होती. आज 7410 नवे रुग्ण आढळले असून 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या स्थिर असली तरी मृतांच्या आकड्यात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापिठांच्या परिक्षांसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील १३ विद्यापीठांच्या वर्षाच्या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला. याकरिता सर्व विद्यापीठांनी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेशही सामंत यांनी दिले. हा निर्णय सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असून या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच या परीक्षांपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा...
- मुंबई - सध्या राज्यभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्र सरकारच्या पाया देखील पडावे लागले तर, राज्य सरकार तयार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना केंद्र व राज्य सरकारमधील मतभेद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंद्र सरकारने रेमडेसिवीर वाटपाचे नियमन करणारे अधिकार स्वत:कडे घेतल्याचे बुधवारी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे राज्याच्या वाट्याला रेमडेसिवीर कमी मिळणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीर द्यावे, अशी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा...
- विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) - या शहरातील असलेला स्टील प्रकल्प कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्याला मोठा दिलासा देणारा ठरत आहे. आज सकाळी ७ टँकरना घेऊन जाणारी ऑक्सिजन ट्रेन महाराष्ट्रातून विशाखापट्टणम स्टील प्लांट येथे दाखल झाली आहे. आज रेल्वे प्रशासनाने मेडिकल लिक्विड ऑक्सिजनचे ७ टँकर पुरवण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. यामुळे राज्याला १०० मेट्रिक टन लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. सध्या सर्व सावधगिरीने टँकरमध्ये ऑक्सिजनसह भरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण 7 टँकरमध्ये शंभर टन लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन पाठविला जाईल. या प्रकारच्या सेवेला रो-रो सेवा असे म्हणतात. ट्रेनमधील टँकर थेट ऑक्सिजन प्लांटकडे गेले आहेत. यासाठी विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांनी रोलिंग मिल्स परिसरात विशेष रेल्वे ट्रॅक बांधला आहे. सविस्तर वाचा...
- नाशिक - सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सद्या केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी दुप्पटीने वाढली असल्याचेही त्यांनी म्हटले. सविस्तर वाचा...
- मुंबई - कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी वाढत चालला आहे. दुसऱ्या लाटेने तर भारतात हाहाकार उडवला असताना कोरोना विषाणूचे नवनवीन म्यूटेशन आढळून येत आहेत. ब्रिटन, ब्राझील म्युटंटनंतर भारतात कॊरोनाचा नवा विषाणू आढळला. त्याच्या जनुकीय रचनेत बदल झाला. तर त्यानंतर आता डबल म्युटंट अर्थात विषाणूच्या आरएनए (राइबोन्यूक्लिक एसिड) मध्ये दुहेरी बदल केला आहे. हा नवा डबल म्युटंट महाराष्ट्रासह देशात थैमान घालत असताना आता चिंता वाढवणारी आणखी एक बाब समोर आली आहे. ती बाब म्हणजे आता भारतात ट्रीपल म्युटंट आढळला आहे. सविस्तर वाचा...
- सोलापूर - कोरोनाने मृत्यू झालेल्या एका ५९ वर्षीय वृध्द महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नात्यातील कोणीही आले नाही. अशा परिस्थितीत एका तरूणाने त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. ही घटना माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात घडली. कुर्डूवाडीतील रेल्वे कॉलनीत अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या ५९ वर्षीय निराधार वृद्धेचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. जितेंद्र युवराज गायकवाड या तरुणाने पुढाकार घेऊन त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. जितेंद्रला डेव्हिड नावाच्या तरुणाने देखील मदत केली. सविस्तर वाचा...
- नाशिक - महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी प्राण गमावले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. याघटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सविस्तर वाचा...
- परळी वैजनाथ (बीड) - भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांचे अंगरक्षक गोविंद नारायण मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. लातुर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले. सविस्तर वाचा...
Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Last Updated : Apr 22, 2021, 11:02 PM IST