- पुणे : नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीवरून रात्री उशिरापर्यंत सुरु असणारी साऊंड सिस्टिम बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच वीस ते पंचवीस जणांच्या जमावाने दगडफेक केली. पुण्यातील पाषाण परिसरात 15 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला. जमावाने केलेल्या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत वीस ते पंचवीस जणांवर गुन्हे दाखल केले असून सहा जणांना अटक केली आहे.
सविस्तर वाचा- कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक
- मुंबई उच्च न्यायालायने सामाजिक कार्यकर्ती आणि वकील निकिता जेकबला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. टुलकीट पसरवल्याचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केला होता. मात्र, आता त्यांना तीन आठवडे दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा- टुलकिट प्रकरण : आरोपी निकिता जेकबला दिलासा, तीन आठवड्यांचा जामीन मंजूर
- कोल्हापूर - फास्ट टॅग अनिवार्य करूनही जर वाहनधारकांचा टोलनाक्यावर वेळ वाचत नाही, तर मग या फास्ट टॅगचा काय उपयोग? असे मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मंगळवारी रात्री किनी टोळनाक्यावर राडा केला. रुपाली पाटी या महामार्गावरून प्रवास करत असताना किनी टोलनाक्यावर फास्टट्रॅक धारक वाहन चालकांच्या वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या. तब्बल २ तास वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागल्याने लोकांची पिळवणूक थांबवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा सुद्धा पाटील यांनी यावेळी दिला.
सविस्तर वाचा- फास्टटॅगला ब्रेक..! मनसे नेत्या रुपाली पाटलांचा कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर राडा
- मुंबई - स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने कायदेशीर बाबी तपासून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्याची फळे उपभोगत असून त्यांच्या कुटुंबियांप्रती आपण कायमच कृतज्ञ राहिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय सेवेत भरतीच्या मागणीच्या अनुषंगाने राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सविस्तर वाचा- स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्याना शासकीय सेवेत सामावून घेणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
- बीड- परळी येथील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर कथित ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या अरुण राठोडला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून अरुण राठोडच्या अटकेनंतरच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची उकल होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सविस्तर वाचा- पूजा चव्हाण प्रकरण : अरुण राठोडच्या अटकेनंतरच गुढ उकलणार
- नवी दिल्ली - लाल किल्ल्यावरील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड आरोपी मनिंदर सिंगला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पितमपुरामधील स्वरूप नगर भागातील त्याच्या घरातून अटक केली. घरातून दोन तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. मनिंदर सिंगने लाल किल्ल्यावर तलवार नेली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
सविस्तर वाचा- लाल किल्ल्यावर तलवार नाचवणारा मोस्ट वॉन्टेड मनिंदर सिंग अटकेत
- हिमाचल प्रदेशातील चंबाच्या दुकानांमध्ये मोठा वारसा पसरलेला आहे. चंबातील थाळ्यांवर चेहरे कोरण्यात आणि मूर्ती तयार करण्यात या कलाकारांचा हात कोणीही धरू शकत नाही. चंबात तयार होणऱ्या धातूच्या मूर्ती आणि थाळ कित्येक वर्षांपासून देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. येथील शिल्पकारांच्या हातात जादू आहे. हे शिल्पकार थाळ्यांवर पोट्रेट, देवांचे फोटो हूबेहूब साकारतात. चंबामध्ये या कलेची सुरुवात ८४ वर्षाच्या प्रकाश चंद यांनी केली. त्यांना त्यांच्या कलेसाठी राष्ट्रपती पुरस्काराने स्नमानित करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा- थाळीवर हुबेहुब पोट्रेट बनवणारे चंबाचे कलाकार; राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित
- नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅली हिंसाचाराप्रकरणी इक्लाब सिंगला आज (बुधवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात त्याला आणण्यात येणार आहे. पंजाबमधील होशियारपूरमधून पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला ९ फेब्रुवारीला अटक केली होती.
सविस्तर वाचा- ट्रॅक्टर रॅली हिंसाचारातील आरोपी इक्बाल सिंगला न्यायालयात हजर करणार
- नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू फॉफ डू प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. आफ्रिकेचा महत्त्वाचा क्रिकेटपटू म्हणून डू प्लेसिसची ओळख आहे.
सविस्तर वाचा- मोठी बातमी..! क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसची कसोटीतून निवृत्ती
- मुंबई - अलीकडच्या काळातील निर्मितीसाठी सर्वात जास्त वेळ घेतलेला चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. हा चित्रपट अयान मुखर्जी यांचे कथानक असलेला आणि दिग्दर्शित केलेला असून यात करण जोहर निर्मात्याच्या भूमिकेत आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ला होणारा वेळ पाहून या चित्रपटाचे पुढचे भाग येतील की नाही याबद्दल शंका उत्पन्न झाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये हा चित्रपट बनविण्याची सुरुवात झाली होती व रिपोर्ट्स प्रमाणे अजूनही काही भागांचे चित्रीकरण शिल्लक आहे.
सविस्तर वाचा- हुश्श...! नागार्जुनचे ‘ब्रह्मास्त्र’मधील संपले शूट!