ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा, आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी - Grand felicitation of CM and DCM in Thane Today

आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा थोडक्यात घेऊ (Top News Today) या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा (Important Top News) आढावा घेऊ .

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी
author img

By

Published : Oct 16, 2022, 7:09 AM IST

आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा :

आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Rain Update Today) - आज म्हणजेच 16 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच 17 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यात, तर 18 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण (PM Modi inaugurated 75 digital banking units today)- आज सकाळी ळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे (डीबीयू ) लोकार्पण करणार आहेत. डिजीटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावेत आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात समाविष्ट होतील, असा डीबीयूची स्थापनेचा उद्देश आहे.

अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर (Amiit Shah currently Bhopal Visit) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमातून याचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ते वैदकीय शिक्षणाचा हिंदी भाषेतून शुभारंभ करणार आहे. भारतामध्ये मेडिकल शिक्षण पहिल्यांदाच हिंदीमधून होणार आहे.

आज 18 जिल्ह्यामध्ये 1165 ग्रामपंचायत मतदान (Gram Panchayat Election 2022) - आज राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे.

आज दिल्लीत पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन (1st National Coal Conference and Exhibition at Delhi) - राष्ट्रीय कोळसा परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे 16 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले आहे. 'भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेने शाश्वत खनिकर्म' ही संकल्पना त्यामागे आहे.

आज उदय लळीतांचा सोलापूर दौरा (Uday Lalit Solapur visit) - आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत सोलापूर दौऱ्यावर आहेत. सरन्यायाधीशांच्या हस्ते सोलापुरातल्या हुतात्मा सभागृह येथे महाराष्ट्राने गोवा बार कौन्सिल यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन पार पडणार आहे.

आज ठाण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार (Grand felicitation of CM and DCM in Thane Today)- आज ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य जाहीर सत्कार पार पडणार आहे. अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे ठाण्याच्या हायलेंड मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.