ETV Bharat / bharat

Today Top News in Marathi : 'यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक! बांगलादेशवर ५ गडी राखून दणदणीत विजय

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. (Today Top News in Marathi ) आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today Top News in Marathi : 'यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक! बांगलादेशवर ५ गडी राखून दणदणीत विजय
Today Top News in Marathi : 'यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक! बांगलादेशवर ५ गडी राखून दणदणीत विजय
author img

By

Published : Jan 30, 2022, 5:53 AM IST

'यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक! बांगलादेशवर ५ गडी राखून दणदणीत विजय

मुंबई - वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात शनिवारी (२९ जानेवारी) भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. यामध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात ५ गडी राखून विजय संपादन केला.

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत किंचित वाढ, 27 हजार रुग्णांची नोंद; 61 जणांचा मृत्यू

मुंबई - राज्यात कोरोनाचा रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून आला आहे. कोरोना रुग्णसंख्येत आज किंचित वाढ झाली आहे. दिवसभरात 27 हजार 971 नवे रुग्ण सापडले आहेत. 61 जणांचा मृत्यू झाला आहे.

बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्यपालांना भेटणार -ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला - पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी कोर्टाकडे राज्यपालांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यासाठी न्यायालयाने ९० दिवसांची वेळ दिला असून राज्यपालांकडून परवानगी मिळाल्यानंतर कडू यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

मुंबई - चित्रपटातील नथुरामच्या भूमिकेबाबत खा. अमोल कोल्हेंचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले..

नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर राजकीय कोंडीत सापडलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज आळंदीत आत्मक्लेश केले. यावेळी त्यांनी नथुराम गोडसे यांचे कधीच समर्थन केले नाही. मी एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारली आहे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीत बिनसलं.. नवीन मित्र शोधण्याचा 'या' पक्षाचा इशारा

मुंबई - पीपल्स रिपब्लिकनचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मित्र पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत मित्र पक्षांना डावलून कामकाज होत आहे. गेल्या अडीच वर्षात आघाडीतील पक्षांना न्याय दिला नाही. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिक पणाला काळिमा फसला असून, आघाडीत आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही मित्र पक्ष शोधू, असा इशारा पीपल्स रिपब्लिकनचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक

टीईटी घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या

शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ॲमेझॉनची सहकार्य करणार?, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई - राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून 'त्या' बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश

मुंबई - भाजपचे 12 आमदार विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबित केल्यानंतर भाजपकडून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत सर्व 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार?, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत

मुंबई - मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.