शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ॲमेझॉनची सहकार्य करणार?, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई - राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून 'त्या' बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश
मुंबई - भाजपचे 12 आमदार विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबित केल्यानंतर भाजपकडून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत सर्व 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार?, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत
मुंबई - मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्या आहेत.
लिव्ह-रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना संपवले पाहिजे - भिडे गुरूजी
सांगली - संभाजी भिडे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला.अत्यंत नीच आणि राष्ट्रविघातक निर्णय असल्याची टीका करत राज्यपालांनी हे सरकार तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.
आठ हजार शिक्षक बोगस असल्याचे आले समोर
मुंबई - आठ हजार शिक्षक बोगस असल्याचे आले समोर आले आहे. शिक्षक पात्रता परिक्षा परिक्षेत हा प्रकार उघट झाला आहे. त्यावर आज काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
कालच्या महत्वाच्या घडामोडी
अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने काही दिवसांपुर्वीच देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी आता मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे.
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
मुंबई - महाराष्ट्र सरकारने आता खुल्या बाजारात दारू विकण्यास परवाणगी दिली आहे. या निर्णयावरून राज्य सरकारवर उलटसुलट टीका होत आहे. दरम्यान, भाजप जास्त आक्रमक होण्याच शक्यता आहे.
राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, पाहा कुठे कुणाची लॉटरी.
मुंबई - राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरूवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आज नगराध्यक्ष निर्णय होण्याची शक्यता.
रेल्वे परीक्षेवरून विद्यार्थ्यांच्या उद्रेकानंतर रेल्वेला सुचले शहाणपण; घेतला 'हा' निर्णय
मुंबई - देशातील सर्व रेल्वे भरती बोर्डानी उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहेत. उमेदवारांचा काही समस्या किंवा तक्रारी असल्यास थेट रेल्वे भरती मंडळाच्या अध्यक्षांना भेटता येणार आहे.