ETV Bharat / bharat

Today's Top News in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर... आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - टॉप न्यूज मराठी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News in Marathi
आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Dec 28, 2021, 5:53 AM IST

  • आज दिवसभरात -
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते कानपूरमध्ये पाच तास राहतील. आयआयटी कानपूरच्या दीक्षांत समारंभात ते भाग घेतील. आजच्या या दौऱ्यात ते विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच एक जनसभेलाही संबोधित करणार आहेत.
  2. आज काँग्रेस पक्षाचा 137वा स्थापनादिवस. १८८५ साली ऐ. ओ ह्युम यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्ताने लखनऊमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
  3. आज हरयाणा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. डॉ. कमल गुप्ता व देवेंद्र बबली हे दोन जण आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
  4. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. यंदा या कार्यक्रमासाठीची नोंदणी आजपासून mygov.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. 20 जानेवारी पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.
  5. आज भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1937मध्ये आजच्याच दिवशी झाला आहे.
  • काल दिवसभरात -
  1. मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख ( Anil Deshmukh In ED Custody ) गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असता त्यांना आज पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात ( Anil Deshmukh Judicial Custody Extend ) आले आहे. ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 55 दिवसांपासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे. सविस्तर वाचा-
  2. मुंबई - राज्यात रस्ते, पाणी, नालेसफाई कामात गैरव्यवहार सुरू आहेत. हत्या, घरफोडी, खंडणी, महिला अत्याचार आदी कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे सांगत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका ( Pravin Darekar on Law and Order ) केली. सरकारने यावर खुलासा करावा, असे आवाहनही दरेकर यांनी केले. विधानपरिषदेत ( Maharashtra Council Winter Session 2021 ) नियम 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. सविस्तर वाचा-
  3. मुंबई - विधान परिषदेचे सदस्यत्त्व संपलेल्या सदस्यांच्या निरोप कार्यक्रमात शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम आणि शिवसेना नेते तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. ( Shivsena Leader Ramdas Kadam and Anil Parab ) सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेत्यांनी निवृत्त सदस्यांवर मते मांडली. यावेळी अनिल परब यांना बोलण्याची सभापतींनी विनंती केली. मात्र, त्यांनी बोलण्यास नकार देत, चुप्पी साधली. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरदेखील फोटो काढण्यास कदम गैरहजर राहिले. त्यामुळे परब आणि कदम यांच्यातील वाद अद्याप धगधगत असल्याचे दिसून आले. ( MH Assembly Winter Session 2021 ) सविस्तर वाचा-
  4. मुंबई - एकीकडे मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. ( Mumbai Omicron Cases Increased ) मुंबईत परदेश प्रवास केलेले ११ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. त्यापैकी ४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ( BMC on Omicron Patients Mumbai ) सविस्तर वाचा-
  5. मुंबई - विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यात यावी म्हणून महाविकास आघाडीचे शिष्ठमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना भेटले होते. त्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्ष निवडणूक पदासाठी सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशा आशयाचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. ( CM Uddhav Thackeray Reply to Governor Bhagat Singh Koshyari ) या पत्राला आता मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले आहे. कशा पद्धतीने ही निवडणूक योग्य आहे? याची माहिती या पत्रात दिली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिली. सविस्तर वाचा-
  • वाचा आजचे राशीभविष्य -

28 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशींसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.