ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jan 19, 2022, 5:57 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Top News
Top News

आज दिवसभरात -

  • ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या याचिकेवर एकत्र सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाशिवाय याचा निर्णय आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

  • मुलायमसिंह यादव यांची सून करणार भाजपात प्रवेश

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबात भाजपने मोठी फूट पडली आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा सिंह यादव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा समाजवादी पक्षासाठी मोठा झटका मानण्यात येत आहे.

  • बारा निलंबीत आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनावर 18 जानेवारीला सुनावणी पार पडली. आज पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे. 18 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं की, जरी विधानसभेच्या सदस्याचं निलंबन झालं असलं तरी तो सदस्यच रहातो फक्त त्याला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार राहात नाही. विधानसभेच्या अध्यक्षांना सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराची मर्यादा किंवा योग्य-अयोग्यता ठरवणं कोर्टाच्या हातात नाही. त्यावर कोर्टाने एखाद्या सदस्याला एका वर्षासाठी निलंबित करणं हे त्या सदस्याचं सदस्यत्व काढून घेण्यापेक्षा वाईट आहे, असे मत मांडले.

  • ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी

मंगळवारी राज्यात नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23, पंचायत समितीच्या 45 तर सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्याचा आज निकाल हाती येणार आहे. त्यामुळे जनताजनार्दाने कोणाच्या हाती कौल दिला आहे, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

नेव्हल डॉकयार्ड मुंबई ( Mumbai Naval Dockyard Accident ) येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. INS रणवीरच्या ( INS Ranvir Incident ) आत झालेल्या स्फोटात नौदलाच्या तीन जवानांना ( Naval Officer Death In INS Ranvir Incident ) जीव गमवावा लागला. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

राज्यात कोरोनाचा रुग्ण संख्या चढ-उतार दिसून येत आहे. ( Corona Patients in Maharashtra ) राज्यात आज (मंगळवारी) 39 हजार 207 नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी 53 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. ( Maharashtra Corona Update on 18 January )

जालना : महाराष्ट्रातून कुणीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांची जीभ कापा आणि १ लाख लाख रुपये मिळवा, अशी घोषणा भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य ( Nana Patole Controversial Statement ) केल्याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात ( Kadil Jalna Police Station ) नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दाखल केली ( BJYM Complaint Against Nana Patole ) आहे. तातडीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. महाराष्ट्रात नारायण राणे यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोले यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल देखील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यातील नगपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विविध महानगरपालिकांतील पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार ( Maharashtra Nagarpanchayat And Zilla Parishad Election ) पडले. त्यानुसार नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी सरासरी 81, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.