ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jan 18, 2022, 6:08 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News in Marathi
Todays Top News in Marathi

आज दिवसभरात -

  • शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्राचार्य एन. डी. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्राचार्य एन. डी. पाटील यांच्यावर आज दुपारी दोन वाजता कसबा बावडा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव सदर बाजार येथील शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. कोरोनाच्या नियमानुसारच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  • राज्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान

राज्यातील 95 नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी संबंधित मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी सार्वजनिर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याबाबत दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आज यांना दिलासा मिळतो की नाही, हे महत्त्वाचे असणार आहे.

  • सर्वात मोठा लघुग्रह आज पृथ्वीच्या जवळून जाणार

अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. आज असाच सर्वात मोठा लघुग्रह पृथ्वीपासून 1.2 मिलियन अंतरावरून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव 7482 (1994 PC1) असे असून, त्याची रुंदी 3 हजार 551 फूट आहे. नासानं या गोष्टीमुळे पृथ्वीला धोका असू शकतो, असे म्हणले आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole statement about PM Modi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा ( MSRTC Action St Worker ) उगरला आहे. सोमवारी 304 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले ( MSRTC Dismissed 304 Employees ) आहे. तर ६ हजार २९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावली आहे.

कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करुन गुंतवणुकदारांना चुना लावणाऱ्या विशाल फटे याने स्वतःहुन पोलिसांना शरणागती पत्कारली आहे. सोमवारी (आज) सायंकाळच्या सुमारास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यालयात विशाल फटे हजर झाला.

मुंबई मनपामध्ये विरप्पन गॅंगने ४० कोटींचा घोटाळा केला आहे. यासंदर्भातील पुरावे मनसेकडे ( BMC School Tablet Scam ) आहेत. यासंदर्भात रितसर आयुक्त स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मुंबई महापौरांना ( MNS Critisize Mumbai Mayor Kishori Pednekar ) हा घोटाळा दिसणार नाही. त्यांनी चष्म्याचा नंबर बदलावा, असा टोलाही त्यांनी यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांना लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.