आज दिवसभरात -
- पंतप्रधान मोदींचे आज जागतिक आर्थिक परिषदेत विशेष भाषण
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रात्री 8.30 वाजता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेत विशेष भाषण करणार आहेत. ही परिषद यंदा कोरोनामुळे प्रत्यक्षात होणार नसून, व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे परिषद भरवण्यात आली आहे. १७ ते २१ जानेवारी दरम्यान ही परिषदर होणार आहे.
- मुंबईमधील चार हजार आरोग्य कर्मचारी आज संपावर
मुंबई - कम्युनिटी हेल्थ वर्कर्स मुंबईमध्ये ( Mumbai Community Health Worker ) तळागाळात जाऊन आरोग्य विभागाचे काम करतात. मात्र, त्यांना किमान वेतन आणि सामान्य अशा सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत गेले कित्येक वर्षे मागणी करूनही या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे महापालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) दुर्लक्ष केले जात असल्याने, आज (सोमवारी) संपावर जाण्याचा निर्णय घेतला ( Community Health Workers Strike ) आहे.
- भाजपातून हकालपट्टी झालेले कॅबिनेट मंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत ( Harak Singh Rawat Expelled From BJP ) यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत ( EX CM Harish Rawat ) आणि राज्यातील इतर नेत्यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत हरक सिंग आणि त्यांची सून अनुकृती हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. हरकसिंग रावत यांच्यासोबत आणखी काही आमदारही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- डॉक्टरांचे आजपासून मुंबईत साखळी उपोषण
मुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापक यांच्या सेवा नियमित कराव्यात, या मागणीसाठी आजपासून मुंबईत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या साखळी उपोषणात राज्यातील सर्व १८ वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक (डॉक्टर) सहभागी होणार आहेत. यापूर्वी कोरोना काळात उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली. अडचणीच्या काळात शासनाला सर्व डॉक्टरांनी मदत केली. मात्र, शासनाने डॉक्टरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. या सर्व घटनेची आठवण करून देण्यासाठी सर्व वैद्यकीय प्राध्यापक (डॉक्टर) साखळी उपोषणाला बसणार आहेत.
- नितेश राणे यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल
मुंबई - नितेश राणे यांच्या जामिनावर आज निकाल येणार आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत.
आजचे राशीभविष्य -
- 17 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत बढती संभवते; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- VIDEO : 17 January Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
काल दिवसभरात -
कोरोना आणि निमोनिया झाल्याने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (Intensive care unit) उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. प्रतीत सामधानी यांनी दिली आहे.
एकाबाजूला देश कोरोनाशी लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही लोक हे वेगवेगळ्या प्रश्नांवरून समाजासमाजात अंतर निर्माण करण्याचा, परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. अमरावती येथील राजापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर अमरावतीत तणावाची स्थिती आहे.
आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांचा हटके अंदाज पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे. साताऱ्यातील सेल्फी पॉईंटवर ( Udayanraje On Selfie Point ) लुंगी घालून येत पुष्पा सिनेमातील 'सामी सामी' गाण्यावर ( Saami Saami Song Pushpa The Rise ) त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( Udayanraje Viral Video ) होत आहे.
नागपूर - मध्य प्रदेशच्या सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिद्ध वाघिणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने व्याघ्र प्रेमी हळहळले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान असलेली टी - 15 'कॉलरवाली' नावाने ( Collarwali supermom tigress died ) आणि 29 शावकांना जन्म देणारी 'सुपरमॉम' या नावाने तिची वेगळी ओळख आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात तिला आणि तिच्या शवकांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असायची. पण, वृद्धापकाळाने तिचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.
लखनौ - देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यात फोडोफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. या आठवड्यात भाजपाच्या 3 कॅबिनेट मंत्री आणि काही आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव ( Sp Mulayam Singh Yadav ) यांच्या सुनबाई अपर्णा यादव या भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता ( Aparna Yadav may be Join BJP ) वर्तवली जात आहे.