ETV Bharat / bharat

आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - आजच्या टॉप न्यूज वाचा एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top-news-etv-bharat-marathi-today
आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Oct 21, 2021, 6:18 AM IST

  • आज दिवसभरात
  • आर्यन खान प्रकरण -

मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याचे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

  • सिद्धार्थ शुक्ला-शहनाज गील गाणं

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे काही दिवसांपूर्वीच निधन झालं. यानंतर सिडनाज म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गील यांच शेवटचं गाणं अधुरा हे आज रीलिज होत आहे. श्रेया घोषाल ने हे गाणे गायलं आहे. प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्साह आहे.

  • जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांच्या अर्जांवर हरकतींचा पाऊस, आज होणार फैसला

जळगाव - जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांवर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान भाजप खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेऊन, निकाल राखून ठेवले आहेत. गुरुवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता उमेदवारांच्या वैध-अवैध अर्जांची अधिकृत घोषणा होणार आहे.

  • एसएससी स्टेनो परीक्षा 2021 -

एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डीसाठी स्कील टेस्ट आजपासून सुरू होत आहे. परीक्षार्थी https://ssc.nic.in/ येथे जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

  • हेलन यांचा वाढदिवस -

सुप्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या जन्म 21 ऑक्टोबर 1939मध्ये झाला. त्यांनी 60, 70 आणि 80च्या दशकात अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केले.

  • काल दिवसभरात -
  • पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. तर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर ईटीव्ही भारत प्रतिनिधीने रूपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला.

वाचा सविस्तर - पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

  • मुंबई - माजी गृहमंत्री आणि माजी पोलीस आयुक्त कुठे हनिमुनला चालले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगाविला आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बेपत्ता असल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यावरून अमृता फडणवीस यांनी ही टीका केली आहे.

वाचा सविस्तर - माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांचे कुठे हनीमुन चालले आहेत? - अमृता फडणवीस

  • मुंबई - क्रूझ ड्रग केस प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आता अजून वाढला आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालाय दाखल करणार असल्याची माहिती आर्यन खानचे वकील अली काशीद देशमुख यांनी दिली आहे. मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे.

वाचा सविस्तर - Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

  • औरंगाबाद - कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने वीज भारनियमन करण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात असले तरी केंद्राकडे पुरेसा कोळसा होता. मात्र, राज्य सरकारने तो घेण्यास असमर्थता दर्शवली, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मराठवाडा रेल्वे विभागाची आढावा बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

वाचा सविस्तर - केंद्राकडे कोळसा साठा मात्र राज्यसरकार घेण्यास तयार नाही - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

  • मुंबई - एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवारी) राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिला आहे.

वाचा सविस्तर - एल्गार परिषद प्रकरण : तेलतुंबडेच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यात उत्तर द्या, कोर्टाचे एनआयएला निर्देश

  • वाचा आजचे राशीभविष्य -

21 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.