पालघर/विरार- विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली गाडीच ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर हा प्रकार घडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते सव्वा चार कोटी रुपये हे गाडीत असून ती ड्रायव्हरने पळवल्याचे सांगितले आहे.
- सविस्तर वृत्त - BREAKING: चार कोटी रुपये घेऊन ड्रायव्हर पसार, एटीएमसाठी पैसे घेऊन आलेली गाडीच पळवली
मुंबई - आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू कृणाल पांड्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले आहे. कृणाल पांड्याकडे युएईहून येताना सोन्याचे दागिने सापडले. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद - दिवाळीच्या रणधुमाळीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजकीय फटकेबाजीची आतशबाजी ऐकायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाचा बाप काढू शकत नाही, त्यामुळे त्यांनी माझा बाप काढला अशी टीका रावसाहेब दानवे यांनी जाहीर भाषणात केली.
- सविस्तर वाचा - पहिले दाऊदचा बाप काढायचे, मग नवाज शरीफचा, आता हिंदुत्व गेल्याने आमचा बाप काढावा लागतो..
रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर अर्णब गोस्वामींसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर कोणताही निकाल न देता 23 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. तर अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढून घेतला आहे. फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढलेला नाही.
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) सरकार विजयी झाले आहे. मात्र, मोदींनी हा विजय कोरोना महामारीचे यशस्वी व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केल्यावरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सिताराम येचुरी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त ०.०३ टक्के मते जास्त मिळाली असल्याते ते म्हणाले.
- सविस्तर वाचा - 'बिहार निवडणुकीतील विजयाचा कोविड, अर्थव्यवस्थेशी संबंध नाही'
- मुंबई - टेनिसपटू सानिया मिर्झा 'एमटीव्ही निषेध अलोन टूगेदर' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. या शोचे उद्दीष्ट क्षयरोग (टीबी) विषयी जागरूकता निर्माण करणे असल्याचे तिने म्हटलंय. या फिक्शन मालिकेत सानिया भूमिका साकारताना दिसणार आहे. टीबीविषयी जागरूकता वाढविणे आणि योग्य औषधे घेण्याचे महत्त्व, याबद्दल जागरुकता करण्यासाठी यावर्षी जानेवारीत टीव्ही शो 'एमटीव्ही निषेध' चा प्रीमियर झाला होता.
सविस्तर वाचा : सानिया मिर्झाची नवी इनिंग, मालिकेतून करणार डिजीटल पदार्पण
- पुणे - कोरोनावर लस कधी येणार? याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लसीसंदर्भातील प्रत्येक बातमी महत्वाची ठरत आहे. अशीच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची 'कोविशिल्ड' लस जी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आयसीएमआर यांच्याकडून तयार केली जात आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठीची नोंदणी पूर्ण झाली आहे.
सविस्तर वाचा : ऑक्सफर्डच्या 'कोविशिल्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नोंदणी पूर्ण
- अमरावती - सणासुदीच्याा काळात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंची विक्री होते. अमरावतीतही अशाच प्रकारच्या एका 'सोनेरी भोग' या मिठाईने भुरळ पाडली आहे.
सविस्तर वाचा : अमरावतीत मिळतेय सोन्याने माखलेली मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क!
- मुंबई - बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? स्पष्ट सांगायचे तर बिहारमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पैलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल, अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नितीश कुमारांना फटकारले आहे.
सविस्तर वाचा : हरलेल्या पैलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच 'तो' सोहळा ठरेल, शिवसेनेची नितीश कुमार यांच्यावर टीका