मुंबई - केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत अधिक जास्तीची मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सविस्तर वाचा - 'लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या नेत्यांनी कांगावा करू नये'
ठाणे - शहरातील वर्तक नगर भागातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृत रुग्णांचे नातेवाईक संतापले असून पालिका अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सविस्तर वाचा - ठाण्यात ऑक्सिजन संपल्याने सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
गडचिरोली - नक्षलवाद्यांनी आज 26 एप्रिलला भारत बंद पुकारलेला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री अहेरी तालुक्यातील मेडापल्लीत चार ट्रॅक्टर व पाणी टँकरला नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहे. आलापल्ली पेरमिलीमध्ये मेडपल्ली पासून तुमीरकसा या गावात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी आणलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी आग लावून दिली. या घटनेमुळे परिसरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावले असून त्यामध्ये पेरमिली एरीया कमेटी माओवादी असा उल्लेख केलेला आहे. - सविस्तर वाचा
मुंबई- मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टिकेची झोड उठली आहे. भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांनी देखील, वाटाघाटी, टक्केवारीसाठी जनतेच्या हिताचा निर्णय मागे घेऊ नये, असे सुनावत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबई - राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील लोकांना सरकार मोफत ‘कोरोना’ लस देणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणा केली. मात्र मोफत लसीबाबतचे अधिकृत धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यामुळे लस मोफत मिळणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सविस्तर वाचा - मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम
मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट उग्र रुप धारण करत आहे. रोज सरासरी 60 हजार रुग्णांची राज्यात नव्याने नोंद होत आहेत. असं असलं तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, ही समाधानाची बाब आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीकडे नजर टाकली असता ही बाब आपल्याला जाणवते. 23 एप्रिल रोजी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 74 हजार पार झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाढणारी चिंता ही मात्र कमी झाली आहे. एक नजर टाकूया दहा दिवसात बरे झालेल्या रुग्ण संख्येच्या आकडेवारीवर -
सविस्तर वाचा - दिलासादायक! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) सुनिल माने याला पाचवा आरोपी म्हणून अटक केले आहे. सुनिल मानेच्या घरी एनआयएने रविवारी छापेमारी केली. त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्त्वाची कागदपञे आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. माने आपल्या कारसाठी बनावट नंबर वापरत असल्याचे तपासात समोर आले.
सविस्तर वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सुनील मानेची क्रेटा गाडी केली जप्त
अमरावती - कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांची होत असलेली अवेहला आपण सर्वांनी पाहिली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कशी गाफील होत आहे, याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात देखील असाच प्रकार घडला आहे. याठिकाणी उपचार घेणारा एक कोरोनाबाधित रूग्ण गायब झाला होता. रूग्णालयापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यावरून आपली आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक..! रुग्णालयाबाहेर आढळला कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह
तारापूर - औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात दूषित वायू सोडल्याने, रविवारी रात्रीच्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात वायुगळती सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या विषारी वायूमुळे नागरिकांना काही काळ डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे व चक्कर येणे आदी त्रास जाणवू लागला. गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांशी संपर्क केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सविस्तर वाचा - तारापूर औद्योगिक क्षेत्रात वायू गळती? नागरिकांना चक्कर, मळमळ, डोळ्यांना जळजळ
लॉस एंजल्स - चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानाचे समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण सुरू आहे. लॉस एंजल्स शहरातील 'द डॉल्बी थिएटर'मध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. २००१ पासून याच ठिकाणी ऑस्करचे वितरण केले जाते. 'मोशन पिक्चर्स आर्टस् अॅण्ड सायन्स'च्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. कोरोना महामारी असतानाही अकादमीने प्रत्यक्ष सोहळ्याचे वितरण ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनास आणि निक जोनास या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.
सविस्तर वाचा - ऑस्कर २०२१ : लॉस एंजल्स शहरात रंगतोय ९३व्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा