ठाणे - दोघा मैत्रिणींचे मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शारदा अविनाश अंबिज (१८) आणि मनिषा निरगुडे (१९) असे मृत अवस्थेत आढळून आलेल्या दोघीचे नावे असून त्या कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडीच्या रहिवाशांच्या होत्या. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सविस्तर वाचा..
अकोला - जिल्ह्यात आज दुपारपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी पावसाच्या सरी तर रात्री सव्वानऊ वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे सर्वदूर चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची आता बियाणे खरेदीसाठी गडबड सुरू होणार आहे. त्यामुळे हा पाऊस पेरणीयुक्त झाला तर शेतकऱ्यांकडून पेरणी उरकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
जालना - जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कामाला लागले आहे. जिल्ह्यातील 47 गावांना नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामध्ये गोदावरी आणि गंगा नदीमुळे 39 गावांना तर पूर्णा नदी मुळे आठ गावांना याचा धोका आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - 2022 ला म्हणजेच पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - केंद्र सरकार हे राज्यांचे पालक आहे. आमच्या राज्यांच्या समस्या आम्ही केंद्राकडेच सांगणार. त्यामुळे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दोन प्रमुख सहकारी राज्याला मदत मिळावी यासाठी पंतप्रधांनांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. या चर्चेत मोदींनी सर्व प्रश्न समजावून घेतले. यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचाही समावेश आहे. मला खात्री आहे की, ज्यापद्धतीने त्यांनी सगळे एकून घेतले त्याच पद्धतीने ते कारवाई सुध्दा करतील. असे शिवसेना नेते संजय राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. सविस्तर वाचा..
अमरावती - नवनीत राणा तुम्ही लाखो अमरावतीकरांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर तुम्ही आता खासदारकीचा राजीनामा द्या, आणि पुन्हा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेले जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने शिक्का मोर्तब केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी हा सल्ला दिला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - अखेर मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा वेगाने प्रवास सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. या सगळ्याचा परिणाम आजपासूनच मुंबईतील अनेक भागात जाणवू लागला आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसत आहे. दक्षिण मुंबई, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील जाणवू लागला आहे. तसेच मध्य रेल्वेची वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. सविस्तर वाचा..
नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य सुविधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नागपुरातील दवाखान्यांमधील खाटा, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेडच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आठपटीने म्हणजेच 989 बेडवरून 7 हजार 730 बेडची वाढ झाली आहे. त्यामुळे दुसरी लाटेवर केवळ एका महिन्यातच नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मुंबईत पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल विभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. यामुळे पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मान्सून आज मुंबईत दाखल झाला असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उप महानिदेशक डॉ. जयंत सरकार यांनी दिली. दर वर्षी मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन होते. मात्र, यंदा वेळे आधीच मान्सूनचा पाऊस मुंबई दाखल झाला असल्याचेही सरकार यांनी सांगितले. मुंबईत पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभर पाऊस पडत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सविस्तर वाचा..