आदिलाबाद(तेलंगाणा)- संपूर्ण देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. तेलंगाणातील आदिलाबादमध्ये टोमॅटोचा भाव हा 200 रुपये प्रति किलो झाला आहे. येथे एक टोमॅटो 20 रुपयांना विकले जात आहे. त्यावरुन टोमॅटोच्या भावाचा अंदाज लावता येऊ शकतो. गेल्या आठवड्यात टोमॅटोचा भाव 100 रुपये प्रति किलो होता. आदिलाबादच्या रायथू बाजारात बुधवारी एक किलो टोमॅटोचा भाव दुपटीने वाढून २०० रुपये झाला आहे. आदिलाबाद जिल्ह्यात टोमॅटोची दररोज सुमारे 50 टनांची मागणी आहे.
गृहिणींचे बजेट कोलमडले - टोमॅटोचे भाव वाढल्याने याचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर झाला आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर गृहिणींना आता आठवड्यातून एक किंवा दोन टोमॅटो वापरावे लागत आहेत. आदिलाबाद जिल्ह्यात टोमॅटोची 20 हजार एकर क्षेत्रात लागवड केली जाते. टोमॅटो उत्पादकांना सरकारी प्रोत्साहनाअभावी नुकसान सहन करावे लागत असल्याने लागवडीखालील क्षेत्र खूपच कमी झाले असल्याची माहिती तेथील शेतकरी देतात.
मागणी वाढल्याने दर वाढले - उत्पादित झालेला टोमॅटो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतो. त्यावेळी किंमत 40 रुपयांपेक्षा कमी आहे. नंतर, इतर राज्यांतून साठा आल्यास किंमत कमी होते, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होते. पावसाळ्यानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील अनेक गावांमधून टोमॅटोची खरेदी केली जाते. यावेळी मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली असून, अचानक मागणी वाढल्याने भावात वाढ झाली असल्याचे शेतकरी सांगतात.
टोमॅटोच्या भावात असा होता बदल - परिस्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी सिंडिकेट तयार करून भाव वाढविण्याचे काम केले आहे. काही राज्यांमध्ये 25 किलो टोमॅटोची किंमत 2 हजार पाचशे ते 3 हजार रुपये आहे. आता घाऊक विक्रेते टोमॅटो त्या राज्यांमधून विकत घेतात आणि 3 हजार पाचशे ते 4 हजार रुपयांना विकतात. म्हणजेच 140 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. तोच टोमॅटो ते किरकोळ बाजारात 170 ते 200 रुपये प्रति किलोने विकत आहेत. त्यामुळे याचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे.
हेही वाचा -