आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उद्घाटन
- राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचा वाढदिवस
- आज जागतिक बांबू दिवस
- आज आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस
- आज राष्ट्रीय नृत्य दिवस
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (१६ सप्टेंबर) किंचित घट होऊन ३५८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सविस्तर वाचा...
- पिंपरी-चिंचवड (पुणे) - महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणार्यांसाठी पक्षाची दारे उघडी आहेत. भाजपातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. काही कारणांमुळे जे पक्ष सोडून गेले. ते परत येत असतील व ते आपल्याकडील कार्यकर्त्यांपेक्षा जास्त ताकदीचे असतील तर त्यांना सामावून घेतले जाणार आहे, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिले. सविस्तर वाचा...
- बीड - दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरूवारी रात्री केज तालुक्यातील बानेगाव येथे घडली. सविस्तर वाचा...
- औरंगाबाद - 'काँग्रेसवाले ताप देतात, तेव्हा मी भाजप वाल्याला बोलावतो, असे उद्धव ठाकरे यांनी माझ्या कानात सांगितले' असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या काहीकाळ आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानाजवळ जात काहीतरी बोलले होते. याबाबत दानवे यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा...
- सातारा - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या गावी जाऊन भेट घेतली. भाजप खासदार उदयनराजेंच्या भेटीनंतर लगेच भिडेगुरुजींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -