नवी दिल्ली - देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. आज बलिप्रतिपदा आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज पदभार स्वीकारणार आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागात मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भाऊबीज कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा यालाच दिवाळीचा पाडवा असेही म्हणले जाते. दानशूर बळीराज्याचे स्मृती पित्यार्थ हा दिवस आज साजरा केला जातो. याच दिवशी पार्वतीने द्युतात भगवान शंकरला हरवले होते, म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा दिवस आहे. देशभरात भाऊबीजदेखील उत्साहात साजरा केला जाणार आहे.
मूलनिवासी सभ्यता संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मूलनिवासी सभ्यता संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन 26 व 27 आक्टोबर 2022 रोजी नागसेन वन परिसर औरंगाबाद येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी 11 वाजता आंध्र प्रदेशचे लेखक, चित्रपट निर्देशक करुणा कुमार करण्यात येणार आहे.
भारत जोडो पुढे ढकलली दिवाळीनिमित्त बहुतांश लोक घरी सण साजरा करतात . त्यामुळे 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' तीन दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे. तर 27 ऑक्टोबरला सकाळी पुन्हा तेलंगणातून प्रवास सुरू होईल.
मल्लिकार्जुन खरगे आज स्वीकारणार पदभार काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ( Mallikarjun Kharge to take charge ) पदभार स्वीकारणार आहेत. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खर्गे यांना 7,897 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी थरूर यांना 1,072 मते मिळाली.
कर्नाटकातील सर्व मंदिरात गोपूजन करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने आज बलिप्रतिदिनानिमित्त सर्व मंदिरात गोपूजन करण्याचे आदेश दिले आहेत. . सरकारच्या आदेशानुसार या दिवशी गाईंना न्हाऊमाखू घातले जाणार आहे. सरकारी आदेशानुसार देवस्थान मंडळाने मंदिरात गो पूजनाद्वारे सनातन धर्माचे संरक्षण केले जाणार आहे
त्रिपुरात 26 ऑक्टोबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे त्रिपुरा सरकारने 26 ऑक्टोबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्रिपुरा, आसाम, मिझोराम, मणिपूर आणि नागालँडसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला चक्रिवादळाचा धोका पाहता 23 ते 26 ऑक्टोबरच्या दिवसांमध्ये मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार वातावरणातील बदलांमुळे बंगाल आणि ओडिशा या भागांमध्ये वादळाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे.