- मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेशी संवाद साधण्याची शक्यता
कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा सर्वसामान्य मार्ग नाही. पण दुसरा काही मार्ग नसल्याने, नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. यासोबत ते याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे देखील म्हणाले होते. आज ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यात ते लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधासंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

- अमित शाह आज आसाममध्ये करणार प्रचार
गृहमंत्री अमित शाह आज आसाम विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. ते आज ३ रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. आसामच्या १२६ विधानसभा जागेसाठी निवडणुका होत आहेत. यातील पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. तर आता तिसऱ्या टप्प्यासाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे.

- केरळ विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस
केरळमध्ये १४० विधानसभेच्या जागेसाठी निवडणुका होत आहेत. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. तर मतदान एका टप्प्यात ६ एप्रिल रोजी होणार आहे.

- मुख्यमंत्री योगी आज बंगाल दौऱ्यावर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. ते आज बंगालमध्ये आयोजित चार सभांना संबोधित करणार आहेत. पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा जागेसाठी आठ टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहेत. यातील पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर ६ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया होणार आहे.

- राकेश टिकेत आज गुजरातमध्ये
शेतकरी नेते राकेश टिकेत आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ते अंबाजी मंदिराला भेट देणार आहेत. यानंतर ते पालनपूर तसेच इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

- मोहन भागवत यांचा हरिद्वार दौरा
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आजपासून दोन दिवसीय हरिद्वार दौऱ्यावर आहेत. ते अखारा महामंडलेश्वर यांच्यासह इतर संतांची भेट घेणार आहेत.

- गाजीपूर बॉर्डरवर आज नरेश टिकेत यांची पंचायत
भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकेत आज गाझीपूर बॉर्डरवर पंचायत करणार आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत ते आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

- जेपी नड्डा यांचा तामिळनाडू प्रचार दौरा
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहे. ते पुदुचेरी येथे प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान, तामिळनाडूच्या २३४ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यात म्हणजे, ६ एप्रिलला मतदान होणार आहे.

- भारत अंंध आणि पाकिस्तान अंध संघांदरम्यान आज टी-२० सामना
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अंध संघांदरम्यान टी-२ मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्या अंध संघात सामना खेळला जाणार आहे.

- शेतकरी आंदोलनाचा 128 वा दिवस
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनचा 128 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या प्रश्नी अनेकदा चर्चा झाली मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
