- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू, केरळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि केरळ राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज मदुरै येथे आयोजित सभेला संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई के पलानीस्वामी यांची देखील उपस्थिती राहणार आहे. सभेला संबोधित केल्यानंतर मोदी केरळसाठी रवाना होणार आहेत. तिथे ते पथानामथिट्टा येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करतील. यानंतर सायंकाळी चार वाजता ते कन्याकुमारी येथे होणाऱ्या सभेला संबोधित करतील. कन्याकुमारीनंतर मोदी ६ वाजता तिरुवनंतरपुरम येथील सभेला संबोधित करणार आहेत.
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री आज आसाम दौऱ्यावर
आसाम विधानसभेच्या प्रचारासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आज आसाम दौऱ्यावर आहे. आसाममध्ये १२६ मतदारसंघासाठी तीन टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्चला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलला झाले. आता अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ६ एप्रिलला होणार आहे.
- शेतकरी आंदोलनाचा १२६ वा दिवस
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनचा १२६ वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या प्रश्नी अनेकदा चर्चा झाली मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
- गोव्याचे मुख्यमंत्री आज गुजरात दौऱ्यावर
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गुजरात दौऱ्यावर आहेत. ते आज डिंडोलीमध्ये दांडी यात्रेत सहभागी होणार आहेत.
- शिवराज सिंह चौहान आज केरळ दौऱ्यावर
केरळ विधानसभेच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज केरळ दौऱ्यावर आहेत. ते आज ३ सभा आणि १ रोड शो करणार आहेत. दरम्यान, केरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.
- विजयकांत आज विरुधाचलममध्ये प्रचार करणार
डीएमडीकेचे नेता विजयकांत आज विरुधाचलममध्ये प्रचार करणार आहे. विरुधाचलममध्ये प्रेमलता यांनी निवडणूक लढवली आहे. त्यांच्या प्रचारासाठी विजयकांत हे प्रचारसभा घेणार आहेत.
- वय वर्ष ४५ वरिल नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा दुसरा दिवस -
देशभरात ४५ वर्षावरिल नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. या लसीकरणाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रात ३ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. हा देशभरातील उच्चांक आहे.
- तेजस एक्स्प्रेस आजपासून बंद
रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई ते अहमदाबाद चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई वाढत्या कोरोनाचा रुग्णामुळे नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत तेजस एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली.
- भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अंध संघांदरम्यानच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अंध संघांदरम्यानच्या टी-२ मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज भारत अंध विरूद्ध बांगलादेश अंध यांच्यात खेळला जाणार आहे. मालिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत ४ एप्रिल रोजी होणार आहे.
- हॉलीवूड चित्रपट 'लिगेसी ऑफ लाइज' आज होणार रिलीज
लिगेसी ऑफ लाइज हा हॉलीवूटपट भारतात आज चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषेत हा चित्रपट भारतामध्ये रिलीज होत आहे. स्कॉट एडकिंस याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून हा एक अॅक्शनपट आहे. स्कॉटने बॉयका, द एक्पेंडेबल आणि आयपीमॅन-४ अशा हिट चित्रपटात काम केले आहे.