ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

news today
news today
author img

By

Published : May 28, 2021, 6:22 AM IST

जीएसटी परिषदेची आज बैठक

जीएसटी परिषदेची आज बैठक होणार आहे. या बैठकीत कोविड औषधे, लस आणि वैद्यकीय उपकरणांवरील करात कपात करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यांच्या महसुलात घसरण झाली असताना त्यांना देण्यात येणाऱ्या भरपाईबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

जीएसटी परिषदेची आज बैठक
जीएसटी परिषदेची आज बैठक

'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज ओडिशा, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर जाणार आहेत. मोदी आधी भुवनेश्वर येथे आढावा बैठक घेतील. त्यानंतर बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर हवाई सर्वेक्षण करतील आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेतील.

पंतप्रधान आज ओडिशा, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार

दहावीच्या परीक्षांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा झाली. परीक्षांबाबत अंतिम प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीराजे आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणावरून नाराज आहेत. त्यामुळे आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. यानंतर ते जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतील? याकडे लक्ष असणार आहे.

छत्रपती संभाजीराजे आज उद्धव ठाकरे, फडणवीसांची भेट घेणार

अजित पवार, डॉ. राजेश टोपे आज साताऱ्यात

साताऱ्यातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे साताऱ्यात आज कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत.

अजित पवार, डॉ. राजेश टोपे आज साताऱ्यात
अजित पवार, डॉ. राजेश टोपे आज साताऱ्यात

हुमाची 'महाराणी' आज होणार प्रदर्शित

अभिनेत्री हुमा कुरेशीची 'महाराणी' वेब सिरीज आज प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. या वेब सिरीजचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं आहे. या सिरीजमध्ये हुमा कुरेशीची भूमिका बिहारच्या राजकारणातील दिग्गज नाव लालु प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांच्याशी मिळतीजुळती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.