राजस्थानमध्ये आजपासून तीन स्तरीय लॉकडाऊन-
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आजपासून ८ जूनपर्यंत तीन स्तरीय लॉकडाऊन असणार आहे.
अॅट्रोसिटी प्रकरणाबद्दल परमबीर सिंह यांच्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी-
मुंबईचे माजी पोलीस परमबीर सिंह यांच्या अॅट्रोसिटी प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट-
राज्यात परीक्षा न घेताच दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता निकालाचा प्रश्न निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. शिवाय निकालावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर व नाशकात आजपासून लॉकडाऊन शिथील-
कोरोना रुग्णसंख्या कमी होताच कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आजपासून लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाने घालून दिलेले निर्बंध कायम असणार आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता-
तौक्ते चक्रीवादळानंतर आता यास वादळामुळे वाऱ्याचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.