तौक्ते चक्रीवादळानंतर आज 'यास' वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता-
तौक्ते चक्रीवादळा पाठोपाठ आता 'यास' या वादळ धडक्याची शक्यता आहे. या वादळाचा आज ओडिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये आजपासून ७ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ-
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून ७ जूनपर्यंत वाढ केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज नुकसाग्रस्त भागांसाठी मदत जाहीर करण्याची शक्यता-
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नुकसानग्रस्त कोकण पाहणीनंतर आज मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज कोकण दौऱ्यावर-
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकण भागाची पाहणी करण्यासाठी कॉग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज कोकण दौरा करणार आहे.

पुण्यातील लसीकरण आज राहणार बंद-
लसींच्या तुटवड्यामुळे पुण्यातील लसीकरण मोहिम आज पूर्णत: बंद राहणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा वाढदिवस-
पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा वाढदिवस. जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
