पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काशीमधील डॉक्टरांशी साधणार संवाद-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काशीमधील डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्करशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आज कोकण दौरा-
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असणार आहे. रायगड, रत्नागिरी या भागाची पाहाणी करुन स्थानिक पातळीवर बैठकही घेणार आहेत.

तौक्ते चक्रीवादळानंतर आज 'यास' वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता-
तौक्ते चक्रीवादळा पाठोपाठ आज 'यास' या वादळाचा बंगाल व ओडिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार आज चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी दौऱ्यावर-
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहाणी करणार आहे.

दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा आज वाढदिवस-
प्रसिध्द दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा आज वाढदिवस. अभिनेत्याबरोबरच ते एक उत्तम निर्माते देखील आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मामीत करण्यात आले आहे.
