केरळ सरकारचा आज होणार शपथविधी कार्यक्रम-
केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफ आघाडी सरकारचा शपथविधी आज होणार आहे. दुपारच्या वेळी हा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.
तौक्ते चक्रीवादळ आज हरयाणामध्ये धडकणार-
महाराष्ट्र आणि गुजरात नंतर तौक्ते चक्रीवादळ आज हरयाणामध्ये धडकणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतल्या जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिसारमधील डॉक्टरांशी साधणार संवाद-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिसारमधील डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधण्याची शक्यता-
कोरोना लसीकरणाबाबत तसेच लसींचा वाढीव साठा महाराष्ट्राला मिळावा यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज कोकण दौरावर-
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले नुकसानग्रस्त भागाची पहाणी करणार आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार आज करणार चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पहाणी-
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, सिंधुदुर्ग या भागांची पहाणी करणार आहे.
मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात -
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण थांबविण्यात आले होते. मात्र आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
तेलगु अभिनेता ज्यनिअर एनटीआर यांचा आज वाढदिवस-
तेलगु सिनेसृष्टीत आपल्या खणखणीत अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता जूनियर एनटीआर यांचा आज वाढदिवस. ते अभिनयाबरोबर दिग्दर्शकही आहेत.