जम्मू काश्मीरमध्ये आजपासून पुढील काही कडक संचारबंदीची अंमलबजावणी-
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आजपासून पुढील काही दिवस कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज डॉक्टरांशी संवाद साधणार-
बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज बाल रोगविषयक टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी संवाद साधणार आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज पांढऱ्या बुरशी संसर्गाबाबत तज्ज्ञांनी संवाद साधण्याची शक्यता-
गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रात पांढऱ्या बुरशी संसर्गाचा प्रसार वाढू नये, या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे आज तज्ज्ञांनी संवाद साधण्याची शक्यता आहे.

कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर-
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग भागाची पाहणी करण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज सिंधुदुर्ग दौरा करण्याची शक्यता आहे.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीचा आज वाढदिवस-
आपल्या कसदार अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या तेजस्विनी पंडित हीचा आज वाढदिवस. ती एक कलाकार आणि एक उत्तम व्यावसायिक सुध्दा आहे.
