औरंगाबाद - राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे, यावर मोदी है तो मुमकीन है अशी खोचक टोला खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पेट्रोल दर वाढीचे नवे विक्रम होत आहेत. अशी टीका त्यांनी आपल्या ट्विट द्वारे केली आहे.
मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे छत्रपतींनी घेतली शरद पवारांची भेट - yaas cyclone live updates
13:16 May 27
मोदी है तो मुमकीन है... पेट्रोल दर वाढ बाबत इम्तियाज जलील संतप्त
12:27 May 27
गडकरींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनची निर्मिती सुरू
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून ब्लॅक फंगसच्या इन्फेक्शनच्या सर्वात प्रभावी ठरत असलेले एम्फोटेरिसिन बी इमल्शन (Amphotericin B Emulsion) इंजेक्शनची निर्मिती सुरू झाली आहे. वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत तयार झाले असून सोमवारपासून या इंजेक्शनच्या वितरण सुरू होणार, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नितीन गडकरी यांच्या गतिशील प्रयत्नातूनच काही दिवसांपूर्वी जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्मिती रेकॉर्ड वेळेत सुरू झाली होती.
11:53 May 27
पदोन्नतीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची बैठक
पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीआधी काँग्रेसमंत्र्यांची विधानभवनात बैठक सुरू झाली आहे. पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यास काँग्रेसचा विरोध आहे.
11:50 May 27
शिवसेनेच्या नगरसेवकासह साथीदारांची तरुणाला घरात घुसुन पट्ट्याने बेदम मारहाण
ठाणे - उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकासह त्यांच्या साथीदारांनी एका रिक्षा चालक तरुणाला घरात घुसून कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नगरसेवकासह दोन जणावर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. तर रवीप्रकाश जयसिंघानी (२३) असे बेदम मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
11:49 May 27
कुरुंदवाडच्या माजी उपनगराध्यक्षावर खुनी हल्ला
कोल्हापूर- कुरुंदवाड पालिकेपासून काही अंतरावर पाणीपुरवठा सभापती जवाहर उर्फ बाबासो पाटील यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना काळात या घटनेने शहरात खळबळ माजली असून प्रथमदर्शनी अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
11:33 May 27
मुंबईतील ग्रँड रोड परिसरातील थ्री स्टार हॉटेल वर छापा, दोन मॉडेल तरुणीची सुटका

11:30 May 27
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेऊन चर्चा केली.
11:29 May 27
महाराष्ट्रात बुधवारपर्यंत 2 कोटी 13 लाख 52 हजार 332 नागरिकांचे लसीकरण
महाराष्ट्रात बुधवारपर्यंत 2 कोटी 13 लाख 52 हजार 332 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.26 मे 2021 रोजी 1,34,577 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली
09:24 May 27
नागपुरात टॉसीलीझुमॅब इंजेक्शनचा काळा बाजार; तिघांना अटक
नागपूर - टॉसीलीझुमॅब इंजेक्शन (TOCILIZUMAB) चा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे, याप्रकरणी पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने होमिओपॅथीच्या दोन डॉक्टरांसह तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपी टॉसीलीझुमॅब हे इंजेक्शन १ लाख रुपयांमध्ये विकत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहकाला पाठवून सौदा पक्का करत आरोपींना रंगेहात अटक केली.
09:02 May 27
मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून तुरळक पाऊस
मुंबई उपनगरांमध्ये आज सकाळपासून तुरळक पावसाला सुरुवात झालेली आहे.
08:53 May 27
प. बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा १ कोटी नागरिकांना फटका; ३ लाख घरांचे नुकसान
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये बुधवारी आलेल्या यास चक्रीवादळामुळे जवळपास एक कोटी नागरिक प्रभावित झाले आहेत. तसेच वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात तीन लाख घरांचे नुकसान तर शेकडो हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. तसेच मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. "
08:48 May 27
नारदा स्टींग ऑपरेशन प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी
नारदा स्टीग ऑपरेशन प्रकरणी आज कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठा समोर तृणमूल काँग्रेसच्या चार वजनदार नेत्यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे. या चारही नेत्यांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्या्त आली होती.
08:37 May 27
आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता
आज दुपारी साडेतीन वाजता राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षणासह कोरोना संदर्भातील आढावा घेऊन राज्यात लॉकडाऊन कायम ठेवणे, किंवा शिथलता देणे या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
08:32 May 27
मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे छत्रपती शरद पवारांच्या भेटीला
मुंबई- मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याच बरोबर मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी राज्यसभेचे खासदार संभाजाराजे यांनी आता पुढाकार घेत राज्याचा दौरा सुरू करून आरक्षणप्रश्नी जाणकांऱ्याच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. ते मराठा समाजाची मते जाणून घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
07:24 May 27
फायझरची कोरोना लस १२ वर्ष वयापुढील सर्वांसाठी उपयुक्त
नवी दिल्ली - अमेरिकन औषध निर्माती कंपनी फायझरची कोरोना प्रतिबंधात्मक लस ही १२ वर्षापुढील सर्वांसाठी उपयुक्त आहे. तसेच ही लस २ ते ८ अंश सेल्सीयस तापमानामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त काळ साठवता येते. बुधवारी कोरोना लसीसंदर्भात भारत सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या फेरीदरम्यान ही माहिती देण्यात आली आहे.
06:48 May 27
फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला भारताकडे सोपवणार अँटिग्वा
अँटिग्वा - पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोकसी डॉमिनिकामध्ये सापडला आहे. त्याला डॉमिनिकामध्ये अवैध्यरित्या घुसखोरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान अँटिग्वाच्या पीएमओने चोकसीला भारत सरकारच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
06:09 May 27
या वादळामुळे दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
यास चक्रीवादळाने बुधवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडक दिली. या वादळामुळे दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज या वादळाच्या प्रभावाने पश्चिमबंगालच्या कोलकाता, मेदिनीपूर जिल्ह्यासह सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलकाताच्या हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली.