- आज दिवसभरात
चित्रपटगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार;
मुंबई - राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ११ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
- भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय खुले होणार
भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय आजपासून खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते बंद करण्यात आले होते. ते आजपासून सुरू खुले करण्यात येणार आहे. हे संग्रहालय मुंबईतील जीडी मार्ग येथे आहे. तर सोमवारी आणि इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी बंद राहणार आहे.
इंडियन ऑईलमध्ये पदभरती -
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये विविध 71 पदांसाठी जाहिरात काढली होती. त्यावर अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
अभिनेत्री परिनिती चोप्राचा वाढदिवस -
आज अभिनेत्री परिनिती चोप्राचा वाढदिवस आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988ला पंजाबी परिवारात अंबाला येथे झाला. ladies vs ricky behl या चित्रपटाच्या माध्यमातून तिने हिंदी चित्रपटात पदार्पण केले. तिच्याकडे आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिले जाते.
- काल दिवसभरात -
- मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर मालदीव आणि दुबईला गेले होते, असा आरोप केला आहे.या आरोपांबाबत ईटीव्ही भारतने समीर वानखेडे यांच्याशी खास संवाद साधला आहे.
वाचा सविस्तर - Exclusive Interview :... म्हणून मला लक्ष केले जात आहे - समीर वानखेडे
- मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात बांधण्यात येत येणारे शिवस्मारक हे बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असा आरोप शिवस्मारक समितीचे माजी अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. या सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एल अँड टी कंपनीला नियमबाह्य मुदतवाढ दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाचा सविस्तर - सरकारने शिवस्मारक बासनात गुंडाळले; विनायक मेटे यांचा आरोप
- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे यांनी मालदीवला गेले असल्याचे मान्य केले, मात्र ते दुबईला कधी गेले नाहीत, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. मात्र, समीर वानखेडे हे दुबईलाही गेले होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत एक फोटोही शेअर केला आहे.
वाचा सविस्तर - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दुबईला गेले होते, नवाब मलिक यांचा दावा
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. राज्यात गुरुवारी (21 ऑक्टोबर) 1573 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, तर 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. गुरुवारी 2 हजार 968 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
वाचा सविस्तर - Corona Update : राज्यात गुरुवारी 1573 नवे कोरोनाबाधित; 39 रुग्णांचा मृत्यू
- औरंगाबाद - एका महिलेचा विहिरीत मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. गुन्हे शाखा आणि एमआयडीसी वाळुज पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत मारेकरी सुनील धोंडीराम खरात (५१, मुळ रा. महालक्ष्मी खेडा, ता. गंगापूर) याला अटक केली आहे. मात्र, या घटनेचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आता तू म्हातारा झाला आहे, तेव्हा आपण भाऊ-बहिणीसारखे राहू असे म्हटलेल्या प्रेयसीला आरोपीने अगदी प्रेमाने मक्याच्या शेतात नेले. तेथे शारिरीक संबंध करण्याची इच्छा व्यक्त करत मातीत डोके दाबून जीव गेल्यावर तिला विहीरीत फेकून दिल्याचे समोर आले आहे.
वाचा सविस्तर - 23 सप्टेंबरला झालेल्या महिलेच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर...; वाचा, काय घडले?
- वाचा आजचे राशीभविष्य -