ETV Bharat / bharat

International Peace Day 2022 : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, जाणून घ्या इतिहास व महत्त्व - TODAY IS INTERNATIONAL PEACE DAY

आज जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस (International Peace Day 2022) साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण जगभरात शांतता वाढावी, सर्व संकटांना समंजस्याने सामोरे जाता यावं हा याचा मुख्य उद्देश (FIND OUT WHY THIS DAY STARTED) आहे.

International Peace Day 2022
International Peace Day 2022
author img

By

Published : Sep 21, 2022, 12:42 PM IST

Updated : Sep 21, 2022, 2:36 PM IST

दरवर्षी २१ सप्टेंबर हा 'जागतिक शांतता दिन' (International Peace Day 2022) म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व देशांमध्ये आणि लोकांमध्ये शांतता टिकुन (FIND OUT WHY THIS DAY STARTED) राहावी. शांत व आनंददायी वातावरणाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1981 मध्ये या दिवसाची सुरुवात केली. यानंतर, 1982 मध्ये सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. 1982 ते 2001 पर्यंत, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जात होता. दोन दशकांनंतर, 2001 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने एकमताने हा दिवस अहिंसा आणि युद्धविराम दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.

शांततेची घंटा वाजवून 'या' दिवसाची सुरुवात : 1982 मध्ये प्रथमच हा दिवस अनेक राष्ट्रे, राजकीय गट, लष्करी गट आणि लोकांद्वारे साजरा करण्यात आला. या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात (न्यूयॉर्क) संयुक्त राष्ट्रांच्या शांततेची घंटा वाजवून होते. जपानच्या युनायटेड नॅशनल असोसिएशनने भेट दिलेल्या (आफ्रिका वगळता) सर्व खंडांतील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून ही घंटा बनवली आहे. ही घंटा युद्धात शहीद झालेल्या व जिव गमावलेल्या व्यक्तिंच्या मोलाची आठवण करून देणारी आहे. जगात सदैव शांतता असावी, असे त्या घंटेवर लिहिले आहे.

जीवनाचे मुख्य ध्येय शांती : जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कला, साहित्य, संगीत, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे. जागतिक शांतता दिनी पांढरे कबूतर उडवून शांततेचा संदेश दिला जातो आणि एकमेकांनी शांतता राखावी अशीही अपेक्षा असते. पांढरे कबूतर शांतीचे प्रतिक मानले जाते. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाकडून विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये शांतता दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातात. जीवनाचे मुख्य ध्येय शांती आणि आनंद प्राप्त करणे आहे, ज्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो. परंतु, शांतीसाठी प्रयत्न करत नाही. संपूर्ण जग सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने जागतिक पातळीवर शांतता राखण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.

काय आहे यावर्षीची थीम : ( INTERNATIONAL DAY OF PEACE THEME )
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यासाठी एक थीम आणली आहे. या वर्षीची थीम आहे 'वंशवाद संपवा. शांतता निर्माण करा.' म्हणजेच जातिवाद दूर करा, शांततेला प्रोत्साहन द्या. युनायटेड नेशन्सचा असा विश्वास आहे की, खऱ्या शांततेचा अर्थ केवळ हिंसाचाराचा नष्ट करणे हा नाही, तर एका अश्या जगाचा निर्माण करणे, जिथे जातीचा विचार न करता,प्रत्येकाला समान वागणूक दिली जाईल. आणि जिथे लोकांची सर्वांगीण दृष्ट्या भरभराट होईल.

Last Updated : Sep 21, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.