नवी दिल्ली - रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर टोसिलिझुमॅब ही प्रभावी ठरत असल्याचे प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन पत्रिका लॅन्सेटने म्हटले आहे. हे औषध हायपोक्सिया आणि सिस्टॅमिट इन्फ्लॅमेशन असलेल्या रुग्णांवर प्रभावी असल्याचे लॅन्सेटने म्हटले आहे.
टोसिलिझुमॅबमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्याचे प्रमाण वाढले आहे. तर रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याचा कालावधी २८ दिवसांनी कमी झाल्याचेही संशोधनात म्हटले आहे. तसेच कृत्रिम व्हेटिंलेशनची गरजही रुग्णांना कमी भासल्याचे लॅन्सेलटमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण संस्थेचे प्रमुख (प्रशिक्षण विभाग) डॉ. सी. रवीचंद्र यांनी वेबीनारमध्ये टोसिलिझुमॅबच्या परिणामाबद्दल माहिती दिली. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांवरही टोसिलिझुमॅब ही उपयोगी असल्याचे डॉ. रवीचंद्र यांनी सांगितले. मात्र, त्याचा वापर केवळ ऑक्सिजन थेरपी आणि विशिष्ट वैद्यकीय समस्यांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांवर करू नयेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-आई वडिलांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अडकलेल्या चिमुकलीच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे
वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे औषधे व इंजेक्शन-
अनेक रुग्ण हे रेमडेसिवीरमुळे बरे होणार आहेत. मात्र, त्याचा वापर विशिष्ट स्थिती करायला हवा. ज्यांना ऑक्सिजन सपोर्ट नाही व जे घरी उपचार घेत आहेत, त्यांनी रेमडेसिवीरचा वापर करू नये, असा त्यांनी सावधानतेचा इशाराही दिला आहे. कोरोनाच्या संकटात रेमडेसिवीर, फॅबिपफ्लू व टोसिलिझुमॅबची मागणी वाढली आहे. मात्र, या औषध व इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणेला अडथळे येत आहेत.
हेही वाचा-आई वडिलांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अडकलेल्या चिमुकलीच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे
दरम्यान, कोरोनाबाधितांना वैद्यकीय सल्ल्याने औषधे घेण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येतो.