चेन्नई - तामिळनाडू सरकारने प्रसिद्ध अशा 'जलीकट्टू' या वळूंच्या खेळास परवानगी दिली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नागरिकांना या खेळाचा थरार अनुभवता येणार आहे. मात्र, कोरोना नियमावलीचे पालन करूनच खेळाचे आयोजन करता येणार आहे. आज ( बुधवार) तामिळनाडू सरकारने अधिकृतरित्या याची माहिती दिली तसेच नियमावली जारी केली आहे.
हेही वाचा - सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा यंदा फेब्रुवारीत सुरू होणार नाहीत; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
कोरोनाच्या पाश्वभूमीवर नियमावली -
जलीकट्टू खेळात नियमानुसार फक्त ३०० जण सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर ईरुधू वैदम निगाझाची या दुसऱ्या एका खेळात दिडशे नागरिक सहभागी होऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांना 'थर्मल स्क्रिनिंग' म्हणजेच शरिराचे तापमान तपासूनच सहभागी होता येणार आहे. यासोबतच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे अनिवार्य आहे.
हेही वाचा - 'कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडून स्वागत'
जानेवारी महिन्यात रंगणार जलीकट्टू खेळ
खेळात सहभागी होणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिकेटही काढावे लागणार आहे. तामिळनाडू राज्यात २३५ अधिकृत कोविड प्रयोगशाळा आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आणखी सविस्तर नियमावली जाहीर करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण भारतात पोंगल सन साजरा केला जातो. त्याकाळात जलीकट्टू या खेळाचे आयोजन केले जाते.