ETV Bharat / bharat

निकालाआधीच तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू; जिंकल्यास पोटनिवडणूक - तामिळनाडू विधानसभा निवडणूक न्यूज

तामिळनाडूमधील काँग्रेसच्या उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी श्रीविलिपुथुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. श्रीविलिपुथुर मतदारसंघातून माधव राव यांचा विजय झाल्यास पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

माधव राव
माधव राव
author img

By

Published : Apr 11, 2021, 4:29 PM IST

Updated : Apr 11, 2021, 4:35 PM IST

चेन्नई - देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात अनेकांनी निष्काळजीपणा करत कोरोना नियमांचे पालन केले नाही. हा निष्काळजीपणा जीवावर बेतला आहे. तामिळनाडूमधील काँग्रेसच्या उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

TN Congress Candidate Madhava Rao Dies Of Covid
संजय दत्त यांचे टि्वट

तामिळनाडू आणि पुडुचेरीचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) प्रभारी सचिव संजय दत्त यांनी ट्विटरवरून माधव राव यांच्या निधनाची माहिती दिली. दु:खाच्या क्षणी माधव राव यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असे संजय दत्त यांनी टि्वटमध्ये म्हटलं.

काँग्रेसचे उमेदवार पीएसडब्ल्यू माधव राव यांनी श्रीविलिपुथुर मतदारसंघातून निवडणूक लढवली. उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर ते आजारी पडल्याची माहिती आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर ते पाझिटिव्ह आढळले. त्यांच्या फुफ्फुसातही इन्फेक्शन झालं होतं. यामुळे ते निवडणुकीत प्रचारही करू शकले नाहीत. त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या मुलीने सांभाळल्याची माहिती आहे.

तामिळनाडूत 6 एप्रिलला पार पडलं मतदान -

श्रीविलिपुथुर मतदारसंघातून माधव राव यांचा विजय झाल्यास पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. जर त्यांचा पराभव झाला. तर निवडणूक घेण्यात येणार नाही. तामिळनाडूतील 234 विधानसभेच्या जागांसाठी सहा एप्रिलला मतदान झालं. इथे केवळ एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. तामिळनाडूमध्ये 234 विधानसभा मतदारसंघासाठी 63.47 टक्के मतदान झालं आहे. तर निकाल 2 मे रोजी लागेल. तामिळनाडूत सत्ता बनविण्यासाठी 118 चा जादूई आकडा आहे.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; शनिवार रात्रीपासून सुरुये चकमक

Last Updated : Apr 11, 2021, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.