ETV Bharat / bharat

पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिपदासह पक्षीय पदांवरून हकालपट्टी करा, तृणमूल नेत्यांसह विरोधकांचीही मागणी - तृणमूल नेत्यांसह विरोधकांचीही मागणी

शिक्षक भरती घोटाळ्यानंतर ईडीच्या तावडीत अडकलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी पक्षांसोबतच आता टीएमसीकडूनही ही मागणी पुढे येऊ लागली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी पार्थ चॅटर्जी यांना मंत्रालय आणि सर्व पक्षांतर्गत पदांवरूनही तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे. कुणाल यांनी तर असे म्हटले आहे की जर पक्षाला त्यांचे विधान चुकीचे वाटत असेल तर पक्ष त्यांना काढूनही टाकू शकतो.

पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिपदासह पक्षीय पदांवरून हकालपट्टी करा

author img

By

Published : Jul 28, 2022, 12:27 PM IST

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या कारवाईनंतर विरोधक मंत्री पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे. आता तर टीएमसीमध्येही पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपद आणि पक्षाच्या सर्व पदांवरून तत्काळ हटवण्यात यावे. त्यांना पक्षातून हाकलले पाहिजे. एवढेच नाही तर कुणाल घोष म्हणाले की, जर पक्षाला माझे विधान चुकीचे वाटत असेल तर मलाही काढून टाकण्याचा पक्षाला पूर्ण अधिकार आहे. मी नेहमीच टीएमसीचा सैनिक राहीन.

  • "Partha Chatterjee should be removed from ministry and all party posts immediately. He should be expelled. If this statement is considered wrong, the party has every right to remove me from all posts," tweets TMC General Secretary Kunal Ghosh pic.twitter.com/JC0JCYfW4C

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) अर्पिताच्या दोन ठिकाणांहून रोख रकमेचे मोठे घबाड हाती लागले आहे. एक दिवसापूर्वी 27 जुलै रोजी, ईडीला कोलकाता येथील अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्‍या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने सापडले होते. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.

शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अलीकडेच अटक केली आहे. अर्पिता मुखर्जी, पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जींच्या जवळची आहे. पाच दिवसांपूर्वी ईडीला अर्पिताच्या फ्लॅटमधून २१ कोटींची रोकड आणि सर्व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या.

हेही वाचा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर साधला निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.