हैदराबाद - कोरोनाच्या काळातही भाविकांचा देवस्थानांकडे दर्शनासाठी ओढा आहे. तिरुपती देवस्थानने भाविकांकरिता १३ ते १६ जुलैकरिता स्पेशल दर्शन तिकिटे जारी केली आहेत. भाविकांनी ही सर्व तिकिटे केवळ १० मिनिटांमध्ये बुक केली आहेत.
तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) १३ ते १६ जुलैकरिता स्पेशल दर्शन तिकिटे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता खुली केली होती. मात्र, तिकिटे उपलब्ध होताच दहा मिनिटांमध्ये दर्शनाची सर्व तिकीटे संपली आहेत. यापूर्वी देवस्थानने जुलै महिन्यासाठी दररोज ५ हजार भाविकांसाठी तिकिटे उपलब्ध केली आहेत.
हेही वाचा-NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे
देवस्थान देशभरात बांधणार ५०० मंदिरे-
दरम्यान, तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) देशभरात ५०० मंदिरे वर्षभरात बांधणार येणार असल्याचे जाहीर केले आहे. देवस्थानकडून बालाजी मंदिरे ही जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात बांधण्यात येणार आहेत. नुकतेच जम्मूमधील माझीन गावामध्ये बालाजी मंदिराची पायाभरणी करण्यात आली आहे. या मंदिराच्या बांधकामाकरिता श्रीवाणी ट्रस्टच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
हेही वाचा-ZIKA VIRUS आणखी १४ जणांना केरळमध्ये लागण
देवस्थान आणखी दोन भाषांमध्ये लाँच करणार चॅनेल-
देवस्थानकडून तेलुगुमध्ये एसव्हीबीसी स्पिरीट्यूल टेलिव्हिजन चालविण्यात येते. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये हिंदी आणि कन्नडमध्येही एसव्हीबीसी चॅनेल लाँच करण्यात येणार आहे. देशभरातील १०० मंदिरांना गोदान करण्यात आले आहे.