ETV Bharat / bharat

Tips For Propose Day 2023 : कसे कराल तुमच्या प्रियकराला प्रपोज, जाणून घ्या टिप्स - प्रेम

व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रत्येकाला आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवू शकता आणि प्रेमसंबंध पुढे नेऊ शकता. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे प्रेम व्यक्त करण्याच्या मार्गातील तुमच्या अडचणी कमी होऊ शकतात.

Tips For Propose Day 2023
कसे कराल तुमच्या प्रियकराला प्रपोज
author img

By

Published : Feb 7, 2023, 7:49 PM IST

व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस 'प्रपोज डे' म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की, 1477 मध्ये ऑस्ट्रियन आर्कड्यूक मॅक्सिमिलियनने मेरी ऑफ बरगंडीपुढे लग्नासाठी प्रस्ताव मांडला होता. हा पहिला प्रस्ताव मानला जातो. त्यानंतरच हा खास दिवस प्रचलित झाला. काही ठिकाणी असे देखील म्हटले जाते की, 1816 मध्ये या दिवशी राजकुमारी शार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केले होते. तेव्हापासून प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोज डे उपक्रमाची सुरुवात या दोनपैकी कुठल्याही घटनेने झालेली असो, पण ती तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्याची एक उत्तम संधी देते.

'प्रपोज डे' च्या दिवशी प्रपोज कुठे आणि कसे करायचे असा संभ्रम प्रत्येक प्रियकराच्या मनात असतो. चला तर मग तुमची अडचण दूर करून काही पद्धती तुमच्याशी शेअर करूया. जेव्हा तुम्ही एकमेकांना ओळखता आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला हरकत नाही, असे जेव्हा तुम्हाला वाटते-तेव्हा या पद्धती लागू केल्या जाऊ शकतात.

हिरवेगार उद्यान किंवा समुद्रकिनारा निवडा : प्रेम व्यक्त करण्यासाठी एकांत जागा शोधली जाते, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. अशा लोकांसाठी ग्रीन पार्कसोबतच तुम्ही बीचवर जाऊन तुमच्या पार्टनरला प्रपोज करू शकता. जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत बोलायला मोकळा असेल तर, तुम्ही त्याच्या आवडीची जागा निवडू शकता.

सूर्यास्त सुद्धा एक संधी देतो : व्हॅलेंटाईन डेच्या वेळी काही प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला सूर्यास्ताच्या वेळी अशा ठिकाणी घेऊन जातात, जिथे सूर्यास्त खूप प्रेक्षणीय दिसतो. तिथे मावळत्या सूर्यासमोर एका गुडघ्यावर बसून प्रेमाचा प्रस्ताव मांडणे, हा एक उत्तम अनुभव आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियोजन करू शकता.

लंच किंवा कँडल लाईट डिनरचीही संधी : तुम्हाला कुठेही जायला वेळ नसेल किंवा बाहेरील देखावे टाळायचे असतील, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला छान लंच किंवा कँडल लाईट डिनरची व्यवस्था करून खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज करू शकता. या दरम्यान, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीची डिश तसेच ठिकाण निवडू शकता. जेणेकरुन तुम्ही तुमचा प्रपोजचा दिवस अप्रतिम आणि संस्मरणीय बनवू शकाल.

कुटुंबासमवेतही संधी : जर तुमच्या प्रियकराच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या प्रेमाची माहिती असेल आणि त्यांना त्याबद्दल कोणताही आक्षेप नसेल, तर तुम्ही तुमच्या घरीही असे कार्यक्रम आयोजित करू शकता. ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील लोक सामील होऊन हा सोहळा अधिक सुंदर करतात.

मित्रांसोबत पार्टीचे प्लॅनिंग : मित्रांसोबत पार्टीचे प्लॅनिंग करून, जर तुमचे प्रेम तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सामील असेल किंवा ऑफिसच्या आवारात असेल, तर तुम्ही तुमच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत पार्टीचे नियोजन करून एकत्र प्रपोज करू शकता. यामुळे आनंद शेअर करण्याची संधी मिळते. यासाठी तुम्ही कोणतेही सार्वजनिक ठिकाण किंवा कार्यालयीन ठिकाण निवडू शकता. किंवा तुम्ही तुमच्या किंवा मैत्रिणीच्या घरीही आयोजन करू शकता, जिथे प्रत्येकासाठी येणे-जाणे सोपे आहे.

हेही वाचा : Why Valentine Day Celebrated : व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? तुम्हाला क्वचितच माहित असेल हा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.