जयपूर - आयएएस टीना डाबी आणि आयएएस प्रदीप गावंडे हे राजस्थान केडरमधील दोन अधिकारी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांची लव्हस्टोरी ( Tina Dabi Love Story) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सुरू झाली. देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा धोका सातत्याने वाढत असताना, राजस्थानमध्येही कोरोनाच्या संसर्गाचा आलेख सातत्याने वाढत होता. तेव्हा राजस्थान सरकारने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची कमान सोपविली. कोरोना संसर्गामध्ये लोकांना चांगली वैद्यकीय सेवा आणि औषधे मिळावीत यासाठी राज्यातील गेहलोत सरकारने बहुतांश आयएएस अधिकाऱ्यांकडे कोरोना व्यवस्थापनची जबाबदारी सोपविली होती.
भेटीचे रुपांतर प्रेमात - कोरोनाच्या संकटात टीना डाबी आणि प्रदीप गावंडे हे एकमेकांना ( Tina Dabi meet Pradeep Gawande ) भेटले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार, वित्त विभागात सचिव म्हणून कार्यरत असलेल्या टीना डाबी या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचा सुरळित पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ आयएएससोबत संपर्कात ( Tina Dabi work in pandemic ) आले. दुसरीकडे, 2013 च्या बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्याकडे काळ्या बुरशीवरील इंजेक्शन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे हे दोन्ही अधिकारी वैद्यकीय यंत्रणांना समजून घेत होते. हळूहळू भेटीचे रुपांतर प्रेमात झाले.
दोघेही अल्बर्ट हॉलमध्ये जेवण करायचे - दुपारच्या जेवणावरून चर्चा वाढत गेल्यावर ते हृदयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचले. खरे तर, कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर दोन्ही आयएस अनेकदा एकत्र जेवण करू लागले. प्रदीप गावंडे यांच्याकडे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालकपद आहे. त्यांच्या विभागाचे कार्यालय जयपूर येथील अल्बर्ट हॉलच्या मागे आहे. इथेच टीना डाबी रोज येत असत. ते दोघी एकत्र जेवत. काही काळानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याला स्टेटस देण्याचा निर्णय घेतला (IAS Tina Dabi Wedding To Pradeep Gawande)
सोशल मीडियावर डाबी ट्रेंडिंग : टीना डाबी गेल्या 2 दिवसांपासून सोशल प्लॅटफॉर्मवर खूप ट्रेंड करत आहे. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. या युपीएसची टॉपरप्रमाणेच डॉ. प्रदीप गावंडे देखील सक्रिय आहेत. दोघांनीही आपली प्रेमकथा बराच काळ ( Tina Dabi Wedding To Pradeep Gawande ) गुप्त ठेवली होती.
घटस्फोटानंतर टीना यांना आले होते नैराश्य- टीना डाबी यूपीएससीमध्ये अव्वल आल्या होत्या. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या बॅचमेटबरोबर 2018 मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने लग्न केले. परंतु हे लग्न दोन वर्षेही टिकले नाही. दोघांनी 2020 च्या नोव्हेंबरमध्ये परस्पर संमतीने न्यायालया टस्फोटासाठी अर्ज केला. 2021 मध्ये टीना डाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, घटस्फोटानंतर टीना यांना खूप नैराश्य येऊ लागले होते. त्यांचे प्रोफेशनल लाईफ चांगले चालले होते. पण वैयक्तिक आयुष्यात गडबड होती. अशा कठीण काळात डॉ. गावंडे यांनी त्यांना साथ दिली.
लग्नाचा विचारपूर्वक निर्णय : आयएएस टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी एकमेकांना पसंत पडताच लग्न करण्याचा निर्णय घेतला असे नाही. दोघेही मे २०२१ पासून सतत संपर्कात होते. त्यांनी भेटत असताना एकमेकांना डेट केले. बर्याचदा दोघे पार्टी किंवा डिनरसाठी एकत्र जायचे. त्यांनी सोबतच वाढदिवसही साजरा केला. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर दोघांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वय हा अडथळा नाही: दोघांमधील वयाचे अंतरदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. प्रदीप गावंडे यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला. त्याच वेळी, टीना डाबींचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झाला. दोघांच्या वयात जवळपास 13 वर्षांचा फरक आहे. प्रदीप गावंडे हे आयएएस टीना दाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. असे असूनही टीना डाबी जीवनाच्या महत्त्वाच्या प्रवासात गावंडे यांच्यासोबत चालण्यास तयार आहे.
टीना डाबी यांच्या लग्नाची बातमीनंतर गावंडेंच्या इन्स्टाग्रामवर वाढले फॉलोअर्स : अवघ्या २४ तासांत आयएएस प्रदीप गावंडे यांच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या ३ हजारांवरून ४० हजार झाली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नाचे फोटो लाखो लोकांनी लाईक केले आहेत. प्रदीप गावंडे यांनी इन्स्टाग्रामवर टीना डाबींसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये टीना यांनी साडी नेसली आहे. त्यामध्ये गावंडे यांनी कुर्ता घातला आहे. प्रदीप गावंडे आणि टीना दाबी यांच्या लग्नाची चर्चा रंगत असतानाच या दोघांचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर होत आहेत.
हेही वाचा-UPSC टाॅपर टीना डाबी घेणार मराठमोळ्या प्रदीप गावंडेंसोबत 7 फेरे, जाणून घ्या कोण आहेत प्रदीप
हेही वाचा-आयएएस टॉपर टीना दाबीचा ग्लॅमरस लूक, सौंदर्यात कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही