ETV Bharat / bharat

Youth dies in tiger attack : महाराष्ट्राच्या अभयारण्यातून बाहेर पडलेल्या वाघाचा मध्य प्रदेशात धुडगूस, हल्ल्यात एकाचा मृत्यू

उत्तर महाराष्ट्राच्या जंगलातील एका वाघाने मध्ये प्रदेशात प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थावर हल्ला केला. उपचारासाठी इंदूरला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबीयांना आठ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. वाघाने त्यांच्या मानेवर हल्ला केला होता.

Youth dies in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 10, 2023, 9:45 AM IST

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

भोपाळ ( मध्यप्रदेश ) : उत्तर महाराष्ट्रातील अभयारण्यातील एका वाघाने मध्य प्रदेशमधील ग्रामस्थावर हल्ला केला. यात गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी खुशियाली गावात वाघाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असताना वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. यात संतोष भास्करे गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला पांधणा तहसीलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर खांडवा जिल्ह्यात हलवण्यात आले. मात्र त्यांचा अखेर मृत्यू झाला. वाघाने त्यांच्या मानेवर हल्ला केला होता.

उपचारासाठी नेत असताना मृत्यू : पुढील उपचारासाठी इंदूरला नेत असताना संतोष भास्करे यांना इंदूरला पाठवण्यात आले. बरवाह शहराजवळ उपचारासाठी नेत असताना दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी आमदारांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहिले. त्यांना आठ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. घटनेवेळी जमाव एकत्र आल्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पांधनचे आमदार राम दांगोडे जिल्हा रुग्णालयात पोहोचले. येथे दाखल असलेल्या संतोषकडून तब्येतीची माहिती घेतली होती. मात्र संतोष भास्करे यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. खरगोन आणि खंडवा येथील वनविभागाचे पथक वाघाचा शोध घेत आहेत.

काठीने मारल्याने चिडला आणि जीवघेणा हल्ला : वाघाला काठीने मारल्याने वाघ चिडला आणि रागात वाघाने जीवघेणा हल्ला केला, असे काहींचे म्हणणे आहे. वाघाने हल्ला करण्याआधी एका प्राण्याची शिकार केली होती. तो विश्रांतीसाठी तेथे थांबला होता. त्या गावात तो जवळपास चार तास शेतात थांबला होता. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी गावकऱ्यांना वाघाला त्रास देऊ नये असे आवाहन केले आहे. मात्र दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढल्याने जंगल परिसरातील नागरिक घाबरले आहेत. काळजी घेण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे.

हेही वाचा : Tiger Attack In Bagaha: बगहामध्ये एका वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू, महिन्याभरातील सातवी घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.