चंदीगड (पंजाब) - पंजाब पोलिसांनी तीन जणांना प्रचंड शस्त्रांसह अटक केली आहे. त्यांच्याजवळ एक विदेशी पिस्तुल, 11 राउंड, एक ग्रेनेड आणि एक आयईडी स्फोटके सापडले आहेत. त्यांची स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला वेळीत टाळण्यात आला आहे.
तिघांना केली अटक -
पंजाबच्या तरनतारण जिह्यात पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आहे. हे तीन दहशतवादी पंजाब येथील मोगा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. कुलविंदर सिंह, कमलप्रीत सिंह आणि कंवरपाल सिंह अशी या तिघांची नावे आहेत.
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त -
तरनतारणचे एसएसपी उपिंदरजीतसिंग घुम्मण यांनी सांगितले, की स्टेशन इन्चार्ज नवदीपसिंग टीमसोबत गस्तीवर असताना त्यांना काही जण संशयास्पद स्थितीत फिरताना दिसले. जिल्ह्यातील भगवानपुरा नाक्याजवळ पोलिसांच्या टीमने एका संशयास्पद गाडीला रोखले. या गाडीतून तीन जण प्रवास करत होते. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ एक विदेशी पिस्तुल, 11 राउंड, एक ग्रेनेड आणि एक आयईडी स्फोटके सापडले. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पंजाबमध्ये मोठ्या कारवायाचा होता कट -
पंजाबमधील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा कट होता असाही संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - मुंद्रा हेरॉईन प्रकरणाच्या चौकशीत 'ईडी'चाही समावेश; 21 हजार कोटींचे ड्रग्ज करण्यात आले होते जप्त