ETV Bharat / bharat

Building Collapsed in Visakhapatnam : विशाखापट्टणममध्ये तीन मजली इमारत कोसळली... तीन जणांचा मृत्यू... एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीचा मृत्यू - विशाखापट्टणममध्ये तीन मजली इमारत कोसळली

विशाखापट्टणम जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रामाजोगीपेट येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या तीन झाली आहे. गुरुवारी सकाळी बचाव कर्मचाऱ्यांनी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. बिहारमधील छोटू (27) असे मृताचे नाव आहे.

Building  Collapsed in Visakhapatnam
विशाखापट्टणममध्ये तीन मजली इमारत कोसळली
author img

By

Published : Mar 23, 2023, 2:45 PM IST

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गुरुवारी तीन मजली इमारत कोसळली. या झालेल्या दुर्घटनेत दोन किशोरवयीन मुलांसह किमान तीन जण ठार झाले आणि अन्य पाच जण गंभीर जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना पहाटे दीडच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. डीसीपी म्हणाले की, जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना किंग जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पाच जण गंभीर : बुधवारी मध्यरात्रीनंतर तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात साकेती अंजली (14) व तिचा भाऊ दुर्गाप्रसाद (17) यांचा ढिगाऱ्याखाली पडून मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये कोमिशेट्टी शिवशंकर, साकेती रामाराव, साकेती कल्याणी, सुन्नापू कृष्णा आणि सतिका रोजरानी यांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि महसूल पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.

मृतांचा आकडा तीनवर : या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. अपघाताच्या वेळी इमारतीत एकूण 8 लोक होते. पाच जखमींना केजीएच रुग्णालयात हलवण्यात आले. डीसीपी सुमित गरुड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. विशाखापट्टणम जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रामाजोगीपेट येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या तीन झाली आहे. गुरुवारी सकाळी बचाव कर्मचाऱ्यांनी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. बिहारमधील छोटू (27) असे मृताचे नाव आहे.

दोन मुलांचा अपघातात मृत्यू : विशाखा येथील रामाराव आणि कल्याणी यांना दोन मुले आहेत. साकेती अंजली (14), दुर्गा प्रसाद (17). या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे पालक साकेती रामाराव आणि साकेती कल्याणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची काळजी घेत असलेल्या दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने पालक रडत आहेत.

हेही वाचा : Sonu Nigam News : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरात 72 लाखांची चोरी, कामावरून काढलेल्या ड्रायव्हरला संशयावरून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.