ETV Bharat / bharat

धक्कादायक! तिघांची गळफास घेऊन आत्महत्या; मुलीची प्रकृती गंभीर - तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, एका मुलीची प्रकृती गंभीर ( three people suicide one injured by hanging ) आहे.

crime
crime
author img

By

Published : Jun 11, 2022, 4:11 PM IST

भिंड ( मध्यप्रदेश ) - मध्यप्रदेशातील गोहड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, एका मुलीचा प्रकृती गंभीर आहे. मुलीला पुढील उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आलं आहे. माहिती मिळताच भिंडचे पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला ( three people suicide one injured by hanging ) आहे.

गोहडपासून 3 किलीमीटर अंतरावर असलेल्या काठमा गावात ही घटना समोर आली आहे. गावातील धर्मेंद गुर्जर हे आपली पत्नी अमरेश, 11 वर्षांचा मुलगा प्रशांत, 9 वर्षांची निष्पाप मुलगी मीनाक्षी यांच्यासोबत राहत होते. त्यांनी शनिवारी ( 11 जून ) आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामध्ये पती, पत्नी आणि 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, 9 वर्षांची मुलगी मीनाक्षीचे प्राण वाचले आहेत. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

घरातून रडण्याचा आवाज - धर्मेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय सकाळी 6 वाजेपर्यंत जागे होतं असत. मात्र, शनिवारी सकाळी घराचा दरावाजा न उघडल्याने नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी घराचा दरवाजा ठोठावला. तरीही कोणी दरवाजा उघडला नाही. पण, आतून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

...अन् काळजाचा ठोका चुकला - पोलीस आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा धर्मेंद आणि त्यांची पत्नी खोलीत लटकत असल्याचे दिसून आले. तर, मुलगा प्रशांत हा जमिनीवर पडून होता. तर मीनाक्षी जमिनीवर पडलेल्या मिनाक्षीच्या मानेवर सुद्धा खुणा होत्या. हे पाहून पोलीस आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मीनाक्षीला ग्वाल्हेरमधील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

तपास सुरु - घटनेची माहिती मिळताच भिंडचे पोलीस अधिक्षक शैलेंद्र सिंह चौहान यांनी घटनास्थळी तात्काळ धाव परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भिंड येथील फॉरेन्सिक चमुनेही तपास सुरु केला आहे. मात्र, संपूर्ण कुटुंबाने एवढे मोठे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा - Moose Wala murder case : सिद्धू मुसेवाला प्रकरणात सौरव महाकालची पंजाब पोलिसांकडून चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.