नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी शनिवारी वसंत विहार येथील एका फ्लॅटमधून तीन मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक माहितीच्या आधारे ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून दरवाजा बंद होता. पोलिसांनी आत प्रवेश केला आणि तिघेही मृतावस्थेत आढळले, त्यासोबत त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट होती. गॅस सिलिंडरही 'अर्धवट उघडे' ठेवले होते.
मंजू (आई), अंशिका आणि अंकू (मुली), अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती जवळच राहणाऱ्या कमला यांनी सांगितले. तिने पुढे सांगितले की, कोरोना काळात घराती कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिघीही एप्रिल, 2021 पासून नैराश्याशी झुंज देत होत्या.
सोसायटीचे अध्यक्ष एम.डेव्हिड यांनी दिलेल्या माहितीनुसार , "शनिवारी (दि. 21 मे) रात्री 8.55 वाजता फोन आल्यानंतर, पोलीस एसएचओसह वसंत विहार येथील वसंत अपार्टमेंटमध्ये पोहोचले आणि त्यांना सर्व दरवाजे आणि खिडक्या सर्व बाजूंनी बंद दिसल्या. आतील खोलीची तपासणी केली असता तीन मृतदेह बेडवर पडलेले आढळले आणि खोलीत तीन लहान ठेवण्यात आल्या होत्या. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - Tamilnadu : दलित महिलेला दफन करण्यास विरोध, रस्त्याच्या कडेलाच केले अंत्यसंस्कार