ETV Bharat / bharat

H3N2 Cases : गुजरातमध्ये H3N2 चे तीन नवे रुग्ण आढळले, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आरोग्यमंत्र्यांचा दावा

author img

By

Published : Mar 12, 2023, 9:43 AM IST

केंद्र सरकारची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. ज्यामध्ये सरकार देशातील सर्व ठिकाणच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे सांगण्यात आले. गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात एच थ्री एन टू नावाचा नवीन विषाणू दाखल झाला आहे. राज्यात एचथ्रीएनटूचे एकूण 3 रुग्ण आढळले आहेत.

H3N2 Cases
गुजरातमध्ये H3N2

गांधीनगर ( गुजरात ) : गुजरातमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. केंद्र सरकारने आणखी 10 राज्यांना अलर्टवर ठेवले आहे. या 10 राज्यांमध्ये गुजरातचाही समावेश आहे. गुजरातमधील परिस्थितीबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल यांनी सांगितले की, गुजरातमध्ये एच थ्री एन टूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमधील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

तीन प्रकार समोर : आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल यांनी सांगितले की, गुजरातमध्ये विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. या विषाणूचे एकूण तीन रुग्ण समोर येत आहेत. ते म्हणाले की पहिल्या प्रकारच्या विषाणूमध्ये सर्दी आणि खोकला होतो. जो सात दिवस रोहतो. च्यानंतर योग्य इपचार घेतल्यास बरा होतो. दुस-या प्रकारात घशात दुखते, त्यामुळे गरज असेल तेव्हाच औषध घ्यावे लागते. तिसऱ्या प्रकारचा विषाणू फुफ्फुसात पोहोचतो. ज्यामध्ये उपचार आवश्यक आहेत, गुजरात राज्यातील सर्व तालुके आणि जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधाही करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत गुजरातमध्ये सुमारे 80 प्रकरणे नोंदली गेली आहेत. नवीन विषाणूची तीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नवीन प्रकारामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

नवीन रूग्णांसाठी घरोघरी जाऊन शोध सुरू : आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल पुढे म्हणाले की, एच थ्री एन टू विषाणूचा ज्या प्रकारे उदय झाला आहे. तो पाहता तालुका आणि जिल्हा स्तरावर सीएचसी, पीएचसी आणि आरोग्य केंद्रांचे कर्मचारी हंगामी फ्लू चाचण्या करत आहेत. घरोघरी जाऊन नवीन रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यांच्यावर तातडीने उपचारही करण्यात आले. या विषाणूसाठी उपयुक्त असलेल्या एसेल्ट पीर नावाच्या औषधाचे प्रमाणही गुजरातमध्ये पुरेसे आहे. या औषधाची मात्रा सर्व जिल्हा, तालुक्यांमध्ये पाठविण्यात आली आहे. सध्या 2,74,000 एवढ्या औषधांचासाठा पुरेसा आहे.

एचथ्रीएनटू धोकादायक नाही : आरोग्यमंत्री म्हणाले की, जो नवीन विषाणू आला आहे तो इतका धोकादायक नाही. काही लोक गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अहमदाबाद सिव्हिलमध्ये साधारण दिवसात सुमारे 3500 ते 4000 रूग्ण नोंदवले जातात. ज्यात सर्व जिल्ह्यांतील त्या व्यतिरिक्त देशातील सर्व राज्यातील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे काही लोक चुकीचे आकडे सादर करून गुजरातचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : Maharashtra Corona Update: एच३ एन२ चे देशात प्रमाण वाढत असताना राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.