ETV Bharat / bharat

तेलंगाणा : मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्यांचा खात्मा - telangana marathi ips

छत्तीसगड सीमेवरील मुलुगू जिल्ह्यातील पेरूरजवळ पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तेलंगाणामधील मुलुगू जिल्ह्याचे मराठमोळे पोलीस अधीक्षक डॉ. संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

sp
sp
author img

By

Published : Oct 26, 2021, 7:07 PM IST

तेलंगाणा - छत्तीसगड सीमेवरील मुलुगू जिल्ह्यातील पेरूरजवळ पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई काल(25 ऑक्टोबर) करण्यात आली. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पोलीस कृती दल यांनी विजापूर तालुक्‍यातील घनदाट जंगलात ही कारवाई केली. तेलंगाणामधील मुलुगू जिल्ह्याचे मराठमोळे पोलीस अधीक्षक डॉ. संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवली जात असून, यात संग्रामसिंह पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.

तेलंगाणा आणि छत्तीसगड सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात नक्षलवादी कारवाया सुरू आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्च ऑपरेशन राबवत आहे. त्याचे नेतृत्व पंढरपूरचे सुपुत्र आयपीएस डॉ. संग्रामसिंह पाटील हे करत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासोबतच दुर्गम भागातील रहिवाशांच्या अडीअडचणी दूर करण्याचे काम डॉ. पाटील सातत्याने करत असतात.

हेही वाचा - ...तर पोलीस संरक्षणाची ढाल उभी करू; नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांना डॉ. संग्रामसिंह पाटील यांचे आश्वासन

  • तीन नक्षलवाद्यांचा खात्मा -

घटनास्थळावरून एसएलआर आणि एके-47 रायफल्ससह 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, पळालेल्या नक्षलवाद्यांसाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

  • कोण आहेत संग्रामसिंह पाटील?

2011 मध्ये डॉ. संग्रामसिंह पाटील यांनी त्यांची एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. त्यांच्या घरातील डॉक्टर होणाऱ्यापैकी संग्रामसिंह पाटील हे तिसऱ्या पिढीतील डॉक्टर आहेत. त्यांच्या घरात एकूण 16 डॉक्टर आहेत. त्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळाल्यावर दिल्लीत जवळपास दीडएक वर्ष रुग्णसेवा केली. पुढे त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी घरच्या परंपरेला फाटा देऊन सिव्हिल सर्विसमध्ये यायचा निर्णय घेतला आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर डॉ. संग्रामसिंह पाटील यांनी यूपीएससी परीक्षेतही यश मिळवले आणि ते पुढे भारतीय पोलीस सर्व्हिसमध्ये तेलंगाणा राज्यात पोलीस अधीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले.

  • डॉक्टर पाटील यांच्याकडून आदिवासींना वैद्यकीय सेवा -

तेलंगाणामधील आदिवासी बहुल मुलुगु जिल्ह्यात पोस्टिंग झाल्यावर संग्रामसिंह पाटील यांनी, परिसराचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्यातल्या डॉक्टरला आपसूकच लक्षात आले की, कायदा व सुव्यवस्थेसोबत येथील नागरिकांना आरोग्यसुविधा पुरवणं गरजेचे आहे. 2019 पासून डॉक्टर संग्रामसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील जवळपास 100 आदिवासी पाड्यांना भेटी दिल्या, आणि तेथील 5 हजार पेक्षा जास्त गोट्टी कोया या आदिवासी जमातीतील नागरिकांना वैद्यकीय मदत पुरवली. या ठिकाणी आदिवासींच्या आरोग्याबाबत अनेक समस्या होत्या. त्यामध्ये पोषण आहाराची कमतरता, हिमोग्लोबिन, त्वचेचे आजार आणि इतर शारीरिक समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. त्यानंतर डॉक्टर पाटील यांच्या प्रयत्नातून जवळपास 7 लाख रुपयांची औषधे या आदिवासींच्या पाड्यामध्ये पोहोचली.

हेही वाचा - दख्खनेतील महाराष्ट्र..! पंढरीच्या 'या' सुपुत्राने आरोग्यासेवेसाठी खाकीवर्दीवर चढवला 'स्टेथोस्कोप'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.