ETV Bharat / bharat

lift Fall In Delhi : लिफ्ट कोसळल्याने मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू - तीन मजुरांचा मृत्यू

पश्चिम दिल्लीतील नारायणा पोलीस स्टेशन ( Narayana Police Station ) हद्दीतील औद्योगिक परिसरात कारखान्याची लिफ्ट पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कारखान्यात हा अपघात झाला त्या कारखान्यात पान मसाला बनवला जातो. (Three laborers died due to lift fall in delhi)

lift Fall In Delhi
लिफ्ट पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 9, 2023, 7:08 AM IST

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील नारायणा पोलीस स्टेशन ( Narayana Police Station ) हद्दीतील औद्योगिक परिसरात असलेल्या कारखान्यात रविवारी संध्याकाळी लिफ्ट पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू ( Three laborers died ) झाला. तर एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच नारायणा पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हरिनगर येथील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात ( Harinagar Deendayal Upadhyay Hospital ) पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. (Three laborers died due to lift fall in delhi)

तीन मजुरांचा मृत्यू : ( Three laborers died ) पश्‍चिम जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त घनश्याम बन्सल यांनी सांगितले की, संध्याकाळी पाचच्या सुमारास नरैना औद्योगिक क्षेत्राच्या ए ब्लॉकमध्ये असलेल्या कारखान्यात लिफ्ट तुटल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व पथकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. लिफ्टमध्ये अडकलेल्या चार जणांना घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. सर्वांना डीडीयू रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तीन मजुरांना मृत घोषित केले, तर जखमी सूरजची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बीएलके रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कुलवंत सिंग, दीपक कुमार आणि सनी अशी मृतांची नावे आहेत. तिघेही इंद्रपुरी आणि किराडी येथील प्रेम नगर भागातील रहिवासी होते. ( Three laborers Died Due To lift Fall )

कारखान्यात होणार लिफ्टची तपासणी : मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कारखान्यात हा अपघात झाला ( Accident happened in the factory ) त्या कारखान्यामध्ये पान मसाला बनवला जातो. ( Pan Masala Industrial Factory ) कारखान्यात दोन प्रकारचे लिफ्ट आहेत. एका लिफ्टमध्ये माल नेला जातो. तर दुसऱ्या लिफ्टचा वापर कर्मचारी करतात. काही वेळा या नियमाचेही उल्लंघन केले जाते. सामान माल वाहून नेणाऱ्या लिफ्टमध्ये कामगारही ये जा करताता. कर्मचार्‍यांच्या लिफ्टमध्ये पान मसाल्याचा सामान नेला जात होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे.कारखान्यात बसविण्यात आलेल्या लिफ्टचा परवाना तपासण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यासोबतच लिफ्टची वेळोवेळी तपासणी झाली की नाही, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. लिफ्टची साखळी अनेक ठिकाणी तुटलेली आढळून आली आहे, त्यामुळे लिफ्टची सेवा बऱ्याच दिवसांपासून सुरू नसल्याची भीती व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.